बेळगाव सीमा प्रश्न महाराष्ट्रातील आजची तरुण पिढी विसरत चालली आहे. - उपमुख्यमंत्री- अजित पवार

  

मुंबई  : ' बेळगाव सीमा  भाग हा महाराष्ट्राचाच असून बेळगाव सीमा  भागा विना संयुक्त महाराष्ट्र अपुरा आहे पण महाराष्ट्रातील आजची तरुण पिढी  हा बेळगाव सीमा प्रश्न  विसरत चालली आहे. या बेळगाव सीमा संदर्भात  महाराष्ट्रातील साहित्यिकानी सदैव आपल्या प्रखर लेखणी द्वारे समाज जागृती करणे  महत्वाचे असून महाराष्ट्रातील आजच्या तरुण पिढीला बेळगाव हा महाराष्ट्राचा भूभाग असून बेळगाव सीमा लढ्यात उतरण्यासाठी जागृत व प्रवृत्त करणे गरजेचे आहे.  बेळगाव सीमा प्रश्न  न्यायालयात सुरू असून महाराष्ट्र सरकार बेळगावसीमा संदर्भात आपली बाजू ठाम व  सक्षमपणे मांडत आहे.  साहित्यिक हा समाजातील  लढयाचा व चळवळीचा मूलभूत  कणा आहा. तो आपल्या  लेखणीतून लोकशाही मार्गाने अन्यायाविरोधात न्यायासाठी लढाई लढत असतो.  जनजागृती, जन प्रबोधन करत असतो..." असे मत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव याच्या  " बेळगाव कुणाच्या बापाचं.. आणि.. प्रेयसी एक आठवण.." या शारदा प्रकाशन ठाणे या प्रकाशन संस्थेनी प्रकाशित केलेल्या पुस्तक प्रकाशन प्रसंगी मुंबई येथे बोलत होते.  यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री हसन मुश्रीफ ,राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खा सुनिल तटकरे,  चंदगड विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय, कार्यश्रम, कार्यशील  आ. मा. श्री.  राजेश नरसिगराव पाटील , ठाण्याचे मा खा आनंद परांजपे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.  हा प्रकाशन सोहळा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यालय मुंबई येथे संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत