सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे व टाटा कॅपिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सुधागडातील पितृछत्र हरपलेले व दिव्यांग विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचे वाटप

 



ठाणे ः सुधागड तालुक्यातील रहिवाशांच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या ठाण्यातील सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ व टाटा कॅपिटलच्या सीएसआर माध्यमातून सुधागड तालुक्यातील शाळांंमधील पितृछत्र हरपलेले व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदतीचे वाटप नुकतेच करण्यात आले.
मराठा समाज भवन पाली येथे सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे चे अध्यक्ष विठ्ठल बाबू घाडगे यांचे अध्यक्षतेखाली सुधागड तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक व प्रतिनिधींची मीटिंग संपन्न झाली. या मीटिंगसाठी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते. टाटा कॅपिटल उडठ माध्यमातून वार्षिक शैक्षणिक स्पर्धा ( निबंध, वक्तृत्व, चित्रकला, प्रश्नमंजुषा) व विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा ( डबलबार, सिंगलबार, धावणे, उंचउडी, लांबउडी, थळाफेक, इत्यादी ) विषयांवर चर्चा व विचार विनिमय करून स्पर्धांचे आयोजन करण्याचे ठरविले. तसेच तालुक्यातील माध्यमिक विद्यालयातील पितृछत्र हरपलेल्या व दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी वार्षिक परीक्षा फी शाळेकडे धनादेश रूपाने अर्थिक मदत देण्यांत आली.  तसेच इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यालयातील विद्यार्थ्यीसंख्येनुसार 2024 ची आवृत्ती 21 अपेक्षित आवृत्ती, प्रश्नसंच आणि जनरल नॉलेज पुस्तकांचे मोफत वाटप संबधित शाळेच्या मुख्याध्यापक व प्रतिनिधींकडे करण्यात आले.
तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी इयत्ता 8 वी ते 10 वी साठी एज्युकेशपन करिअर गायडन्स (अभ्यासाचे कौशल्य, गोल सेटिंग, वेळेचे सुव्यवस्थापन, मेमरी टेक्निक्स, करिअरचे विविध पर्याय इत्यादी) शिबीर विद्याथी व पालक प्रत्येक शाळेंत घेण्याचे ठरविले आहे.  वरील विषयावर उपस्थित मुख्याध्यापकानी चर्चेत भाग घेऊन मते मांडली की, सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे ही संस्था विद्यार्थ्यांच्या आधुनिक तंत्रज्ञान व प्रगतीसाठी गरजा ओळखून त्यानुसार  काम करीत आहे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. श्री बळीराम निंबाळकर सर, समन्वयक  यांचे सर्वाना मोलाचे मार्गदर्शन मिळाले मीटिंगसाठी श्री वसंत लहाने उपाध्यक्ष, श्री राजेश बामणे सदस्य उपस्थित होते. 4 तास चाललेल्या या मीटिंगमध्ये
तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांच्या व प्रतिनिधी यांनी मोलाचे विचार मांडून सहकार्य केले. मुख्याध्यापक यांच्यावतीने सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे व टाटा कॅपिटल यांचे मनःपूर्वक आभार मानले!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत