रेल्वे पोलिसांकडून रेझिंग डे साजरा रेल्वे प्रवशांना दिली सायबर गुन्ह्यांची माहिती
ठाणे : मुंबईसारख्या शहरावर नेहमी दहशतवाद्यांच्या हल्ल्याचे सावट असते. त्यातच 26 /11च्या अतिरेकी हल्ल्या नंतर पोलीस अधिक सजग झाले आहेत. ठाणे रेल्वे पोलिसांनी देखील सुरक्षेचा हाच धागा पकडत रेझिंग डे च्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांना जागृत करण्याचे काम केले. तसेच विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शस्त्रांची माहिती दिली.
महाराष्ट्रात ठिकाणी पोलिसांमार्फत रेझिंग डे म्हणजेच महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा होत आहे. रेल्वे पोलिसांनी ठिकाणी अशा प्रकारे हा दिवस साजरा केला. ठाणे रेल्वे पोलिसांनी गुरुवारी (ता.४) नाखवा हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्यात आणून त्यांना पोलिसांच्या कामकाजाची माहती दिली. कायदा सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर कायमच असते. कधी कोणाकडून कसा हल्ला होईल, घातक कृत्य होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे अशा संकटसमयी लोकांनी देखिल पोलिसांसारखेच जागृत आणि दक्ष राहणे आवश्यक आहे. ही बाब विचारात घेऊन पोलिसांनी ह दिवस साजरा केला. विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कामकाजाची माहिती दिली. सध्या पोलीस वापर असलेल्या अत्याधुनिक शस्त्रांचीही त्यांना ओळख करून देण्यात आली.
तसेच आजच्या डिजीटल युगाच्या काळात मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हे घडत आहेत. या गुन्ह्याला विद्यार्थी आणि तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात बळी पडत आहे. त्याबाबत काय काय खबरदारी घ्यायची याची माहिती सुद्धा देण्यात आली. मंगळवार (ता.२) रोजी ठाणे रेल्वे स्थानक फलाट क्रमांक २ वर 'सोशल मीडिया शाप की वरदान' त्यामुळे होणारे सायबर गुन्हे व त्यामुळे घ्यावयाची दक्षता या संदर्भात सेवा सहयोग फाउंडेशन ठाणे यांच्या बाल कलाकारांकडून जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक पी.व्ही. कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक एस.जी. खंदारे, पोलीस अमलदार, पोलीस हवालदार डी.एस. पारधी. पोलीस शिपाई प्रशांत नागारपोले, नाखवा हायस्कूलचे घोलप सर यांच्यासह रेल्वे प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.jpeg)
Post a Comment