अस्पी चिल्ड्रन्स अकॅडमी शाळेला इंडीया स्कूल रँकीग २०२३ – २४ नामांकन
या रँकीग मध्ये स्टेट बोर्डाच्या भारतातून २२ हजाराहून अधिक व महाराष्ट्र व महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधून सुमारे १२ हजाराहून अधिक शाळांची नामांकने आली होती. या शाळांमधुन देश, राज्य व जिल्हा स्तरावर सुपर ३० शाळांची निवड करण्यात आली. यामध्ये शाळा ज्या संस्थेकडून चालवली जाते त्या संस्थेची शिक्षणाप्रती ध्येय-उद्दीष्टे, शालेय शिक्षण व्यवस्थापन, शालेय शिस्त व भौतीक सोयी सुविधा, बाह्य लेखापरिक्षण, शालेय वातावरण व शैक्षणिक धोरणे, पालकांकडून प्राप्त गोपनीय अहवाल अशा विविध पद्धतीने शाळेची ह्या पुरस्कारासाठी निवड व नामांकन प्रक्रीया राबविली आली . या सर्व परिक्षणाअंती उचाट शिक्षण संस्था संचलित अस्पी चिल्ड्रन्स अकॅडमी या इंग्रजी माध्यम शाळेस सुपर ३० बजेट स्कूल ह्या पुरस्कारात भारतात २२ वा, महाराष्ट्रात ७ वा व पालघर जिल्ह्यात १ ला क्रमांक प्राप्त झालेला आहे. उचाट शिक्षण संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची निरलस मेहेनत व शिक्षणाप्रती त्यांचे कोणत्याही अपेक्षेशिवाय अविरत सेवाव्रत व इंग्रजी माध्यम शाळेप्रती अव्यावसायिक दृष्टीकोन हे या पुरस्काराचे मुळ स्त्रोत आहे. या पुरस्कारासाठी नामांकन होण्यासाठी व शाळेस या स्तरावर पोहोचवण्यासाठी अस्पी ग्रुप ऑफ कंपनीचे डायरेक्टर शरदभाई पटेल व किरणभाई पटेल तसेच रोटरी क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थ वेस्ट मालाड मुंबईचे डॉ. विपुल पटेल यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हा पुरस्कार संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीतील शिरपेचात रोवलेल्या एक अनमोल रत्नाप्रमाणे आहे.

Post a Comment