जिल्हा स्तरीय रायफल शूटिंग स्पर्धा मेजर सुभाष गावंड शूटींग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची उत्तम कामगिरी
ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे क्रीडा व युवा सेवा संचालनालय,जिल्हा परिषद,ठाणे व ठाणे महानगरपालिका ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरीय रायफल शूटिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये १०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग होता. त्यापैकी प्रशिक्षक अक्षय पांडुरंग साळुंखे आणि अजित पाटील ह्यांचा मार्गदर्शनाखाली यामध्ये १७ वर्षाखालील गटात श्रीमई नायक - सुवर्ण,सिध्देश थोरात - सुवर्ण,देवांश पाटील - सुवर्ण ,अर्णव राणे - सुवर्ण, मिहिर संबोधी - सिल्व्हर,देवरश पाटील - सुवर्ण,अर्णव शिरसाट - सिल्व्हर आदी नेमबाजांनी पदक पटकाविले.
ठाण्यातील कोपरी ठाणे पूर्व येथील मेजर सुभाष गावंड शूटींग अकॅडमी (द्रोणाचार्य स्पोर्ट्स अकॅडमी) मध्ये मुलांना देण्यात असलेल्या उत्कृष्ट प्रशिक्षणामुळंच अकॅडमी मधील ५ मुलांनी सुवर्ण तर दोन मुलांनी सिल्व्हर पदक पटकावले. सर्वात जास्त पदके मिळवणारा ठाण्यातील हि एकमेव शूटिंग क्लब ठरले आहे.

Post a Comment