स्थानिक लोकप्रतिनिधींचे गुंड पाण्यासाठी ३० ते ४० लाखाची खंडणी दर महिन्याला गोळा करतात - नजीब मुल्ला
ठाणे ౹ प्रतिनिधी-स्थानिक लोकप्रतिनिधीचे १६ गुंड कळवा पूर्व येथील लोकांकडून दर महिन्याला ३० ते ४० लाखाची खंडणी गोळा करतात, अशी माहितीपोलिसांनी दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत. बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी दिली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद पराजपे, ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश बर्डे, युवक काँग्रेस अध्यक्ष विरु वाघमारे, कार्याध्यक्ष संदेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कळवा पूर्व येथे विघ्नहर्ता गणेशाच्या दर्शनाला गेल्यावर लोकांनी पिण्याच्या पाण्याविषयी आमच्याकडे तक्रारी केल्या. स्थानिक लोकप्रतिनिधींची लोक प्रत्येक कुटूंबाकडून बोअरवेलच्या पाण्यासाठी ५०० रुपये गोळा करत असतात अशी माहिती दिली. याबाबत पोलिसांकडे शहनिशा केल्यानंतर पोलीसांच्या तपासात येथील स्थानिक लोकप्रतिनिधींचे १६ गुंड दरमहिन्याला लोकांकठून ३० ते ४० लाख रुपयांची खंडणी गोळा करत असल्याची माहिती दिली, ही खंडणी वसूल करणार्यांची नावे व यामागील सूत्रधार लवकरच जाहीर करणार असल्याचेही नजीब मुल्ला यांनी संकेत दिले.
कळवा पूर्व येथील भास्कर नगर, पौंडपाडा, आतकोनेष्शर नगर येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या तक्रारीनंतर ठाणे महापालिका आयुक्तांकडे तत्काळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन दिले असून स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मदतीने केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत २४० कोटी रुपये पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेला देण्यात आले आहेत. या अमृत योजनेतुन कळवा पूर्व येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सहा महिन्यात मार्गी लावणार आहोत, ही बाब आमदार जितेंद्र आव्हाड यांना कळल्यानंतर गेली १४ वर्ष शांत बसलेले आव्हाड जागे झाले आणि शुक्रवारी कळवा पूर्व येथील नागरिकांच्या पाण्यासाठी हंडा मोर्चा काढून श्रेयाचे राजकारण करत असल्याचा आरोप नजीब मुल्ला यांनी केला.
गेली १४ वर्षे विकासाच्या गप्पा मारणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांनी कळवा पूर्व नागरिकांसाठी प्रत्यक्षात काहीही केलेले नाही.आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस भास्कर नगर, पौड पाडा, आतकोनेष्शर इथला पाणी प्रश्नावर मार्ग काढत असताना हंडा मोर्चा काढून दिखाव्याचे राजकारण फक्त श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शहर ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला.
.jpeg)
Post a Comment