शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी जनजागृती , ठामपाच्या विविध प्रायमरी शाळेत उपक्रम
ठाणे : (प्रतिनिधी) : शालेय विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य आणि स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रातील शाळांची सामाजिक दायित्व (सीएसआर ) उपक्रम अंतर्गत डाबर इंडिया लिमिटेडने हातमिळवणी केली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील ठाणे महापालिका शाळा क्रमांक 7 व शाळा क्रमांक 5 प्राथमिक शाळेत जनजागृती सत्र आयोजित केले होते , या सत्राद्वारे मुलांना स्वच्छतेची माहिती दिली. याप्रसंगी शाळा क्रमांक ५ च्या प्रभारी अरुणा अंभुरे, शिक्षिका रेखा पांचाळ, शाळा क्रमांक ७ च्या प्रभारी अर्चना जोशी, शिक्षिका प्रांजली निजई ह्यांनी मुलांना मार्गदर्शन केले
दरम्यान, डाबर इंडिया लिमिटेडचे विपणन प्रमुख सनथ रवींद्रन पुलिककल यांनी याप्रसंगी आपले विचार मांडले. "शहरातील मुलांना स्वच्छतेबद्दल शिक्षित करण्यासाठी शाळांसोबत भागीदारी असे करण्यात आम्हाला खूप आनंद होत आहे. विद्यार्थ्यांना सॅनिटायझेशनबाबत जागरूक करून त्यांच्या कुटुंबियांनाही स्वच्छतेची माहिती मिळते असे ते म्हणाले. यावेळी उपस्थित असलेले डॉ सुमित म्हणाले की, “विद्यार्थ्यांना स्वच्छतेची माहिती देणे अत्यंत गरजेचे आहे. या सुरुवातीच्या वर्षांत मुले ज्या सवयी शिकतात त्या आयुष्यभर त्यांच्यासोबत राहतात. अशा परिस्थितीत मुलांना आरोग्यदायी सवयी शिकवणे गरजेचे आहे. स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लावून ते आजार टाळू शकतात हे मुलांनी समजून घेतले पाहिजे.“ शहरातील ३०० हून अधिक मुलांना वैयक्तिक स्वच्छता आणि जेवणाचे ताट धुण्याचे फायदे याबद्दल माहिती देण्यात आली. दरम्यान मोहिमेअंतर्गत डाबर या शाळांना ओडोपिक डिशवॉशिंग बार आणि आमचे लहान मुले खातात त्या भांड्यांची स्वच्छता करण्यासाठी नवीन डिशवॉश क्रीम देखील उपलब्ध करून दिली.

Post a Comment