कोयना क्षत्रिय मराठा समाज सेवा संघ आयोजित श्रावणसरी, झिम्मा फुगडी कार्यक्रम
ठाणे : प्रतिनिधी
कोयना क्षत्रिय मराठा समाज सेवा संघाच्या वतीने कोयना धरणातील पुनर्वसन गावांच्या क्षत्रिय मराठा समाजाच्या या संस्थेच्या वतीने ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे शनिवार दि. २१ ऑक्टोंबर २०२३ रोजी श्रावणसरी, झिम्मा फुगडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे कोयना क्षत्रिय मराठा समाज सेवा संघाच्या वतीने ठाण्यात घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या नियोजन बैठकीच्या वेळी संस्थेच्या महिला सचिव कृत्तिका कदम यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना सांगितले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विजय मोरे, सरचिटणीस सुरेश साळवी, खजिनदार दिलीप कदम, कार्याध्यक्ष शिवाजी साळुंखे, प्रसिद्धी प्रमुख अमोल कदम, महिला जिल्हाध्यक्षा श्रद्धा शिंदे उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्प बाधित नागरिक मागील ६० वर्षापासून ठाणे, रायगड, पालघर जिल्हा या ठिकाणी आपले वास्तव्य करत आहेत. आपला समाज एक व्हावा, समाजाप्रती आपुलकी निर्माण व्हावी, समाजामध्ये विविध उपक्रमांद्वारे जनजागृती व्हावी याकरिता कोयना क्षत्रिय मराठा समाज सेवा संघ मागील ३० वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यामध्ये राबवत आहे. संस्थेमार्फत कबड्डी, भजन स्पर्धा, हळदी कुंकू, विद्यार्थी गुणगौरव समारंभ, सामाजिक पुरस्कार सोहळा, श्रावणसरी असे विविध कार्यक्रम घेण्यात येतात. यामुळे दरवर्षी प्रमाणे या वर्षी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे शनिवार दि. २१ ऑक्टोबर २०२३ रोजी महिलांकरिता श्रावणसरी, झिम्मा फुगडी या कार्यक्रमाचे आयोजन संस्थे मार्फत केले असून या कार्यक्रमाला २४ गावातील महिला सहभागी होणार आहेत. यामुळे या कार्यक्रमाला कोयना क्षत्रिय मराठा समाज सेवा संघाच्या वतीने कोयना क्षत्रिय समाज बंधू आणि भगिनींनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन कोयना क्षत्रिय मराठा समाज सेवा संघाचे अध्यक्ष विजय मोरे, सरचिटणीस सुरेश साळवी, खजिनदार दिलीप कदम, कार्याध्यक्ष शिवाजी साळुंखे, प्रसिद्धी प्रमुख अमोल कदम, महिला सचिव कृतिका कदम, महिला जिल्हाध्यक्षा श्रद्धा शिंदे, ठाणे जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत कदम, विनोद साळवी, यशवंत साळुंखे यांनी केले आहे.

Post a Comment