flowers

रासरंग - २०२३ उत्सवात रंगला महीलांसाठीचा विशेष भोंडला कार्यक्रम !!



डोंबिवली - कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतूनडॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ यांच्या वतीने डोंबिवली येथील डी. एन. सी. शाळेच्या मैदानात आयोजित करण्यात आलेल्या रासरंग -  २०२३ नवरात्रोत्सवा दरम्यान आजशनिवारी महिलांसाठी विशेष भोंडला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भोंडला कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होत  महिलांनी  उत्सवाचा आनंद घेतला. यावेळी पारंपरिक पद्धतीने सुरुवातीला भोंडला पूजन आणि देवीची आराधना करून महिलांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. सुप्रसिध्द अभिनेत्री सुकन्या मोने यांनी हजेरी लावून सर्वांचा उत्साह द्विगुणित केला. यानंतर  फुगडीमंगळागौरसामूहिक नृत्यम्हणीउखाणे यांचा रंगतदार सोहळा पार पडला. तसेच यावेळी अनेक लहानग्या मुलींनी देवीच्या गाण्यांवर नृत्य करत सर्वाचे लक्ष  वेधून घेत मने  जिंकली. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता.

 

या प्रसंगी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकारीकार्यकर्त्याही उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत