राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने ठाण्यातील नवदुर्गांचा सन्मान
प्रतिनिधी ౹ ठाणे
राष्ट्रवादी महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या संकल्पनेतून नवदुर्गा सन्मान सोहळ्याचे आयोजन, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनानुसार, दुर्गाउत्सवाच्या निमित्ताने, ठाण्यातील नवदुर्गांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्षा वनिताताई गोतपागर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
समाजात, शासनाच्या बरोबरीने काम करीत राज्याच्या व देशाच्या प्रगतीमध्ये या नवदुर्गांचा महत्वपूर्ण सहभाग आहे. या राज्याच्या व देशाच्या जडणघडणीत अमूल्य योगदान दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या नवदुर्गांना, सन्मानपूर्वक मानपत्र प्रदान देण्यात येऊन व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी पहिल्या टप्प्यात दैनिक सकाळच्या ब्युरो चीफ-पत्रकार श्रीमती हेमलता वाडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त (नौपाडा विभाग) सौ. प्रिया ढाकणे, रिक्षा चालक सौ वर्षा कुरणे, ठाणे महापालिकेच्या सफाई कामगार संगिता खर्डिकर या ठाणे शहरातील विविध क्षेत्रात कर्तृत्व बजावणाऱ्या नवदुर्गांचा यथोचित सन्मान शनिवारी, ठाणे मध्यवर्ती कार्यालयात करण्यात आला.
याप्रसंगी ओवळा-माजीवडा अध्यक्षा सौ वंदना खानोलकर, कोपरी-पाचपाखाडी विधानसभा अध्यक्षा सौ.सुवर्णा खिल्लारी, ठाणे विधानसभा अध्यक्षा सौ.अरुणा पेंढारे, विधानसभा अध्यक्षा सौ. वंदना खानोलकर, सौ. शामल दाभाडे, सौ. मनिषा जाधव, सौ. लता चव्हाण याप्रसंगी या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Post a Comment