नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचा सामाजिक उपक्रम.- रक्तदान शिबिरासह दिव्यांग बांधवांना उपयोगी साहित्य वाटप शिबिर
डोंबिवली - कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळातर्फे मोठ्या उत्साहात डोंबिवली येथे नवरात्रौत्सव साजरा करण्यात येत आहे. या उत्सवाच्या माध्यमातून संस्कृती जपण्याबरोबरच सामाजिक भान राखत डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून रविवारी, डोंबिवली पूर्व येथे रक्तदान शिबिर आणि दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव बसविण्याबाबत शिबिर राबविण्यात आले. नवजीवन रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांनी तसेच शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चांगला प्रतिसाद दर्शविला. यावेळी सुमारे १०० बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.
खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मतदारसंघात लोकसेवेची अनेक कामे सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकांची रुग्णसेवा करता यावी यासाठी तसेच अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने नियमित स्वरूपात आयोजन करण्यात येते. सध्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सर्व गरबा रसिकांना मोठ्या उत्साहात उत्सव साजरा करता यावा यासाठी डोंबिवली येथील डी.एन.सी. शाळेच्या मैदानात रासरंग - २०२३ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच या उत्सवाला गरबा प्रेमिंची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. याच बरोबर या उत्सवाला आतापर्यंत सुनील ग्रोव्हर, राजकुमार राव, गुलशन ग्रोव्हर, गौरव चोपडा, संगीत दिग्दर्शक जिगर यांच्यासह मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी उपस्थिती लावली आहे.
नवरात्रोत्सवाची परंपरा जपण्याबरोबरच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी देखील जपली जात असल्याचे दिसून आले आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून रविवारी, डोंबिवली पूर्व येथील डी.एन.सी. शाळेजवळील नीलपद्म सभागृह येथे रक्तदान शिबिर आणि दिव्यांग बांधवांना मदत साहित्य वाटप आणि कृत्रिम अवयव बसविण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डोंबिवली तसेच आसपासच्या शहरांमधून आलेल्या दिव्यांग बांधवांची तपासणी करत त्यांना कृत्रिम अवयव बसविण्यासाठी त्यांच्या आरोग्य स्थितीची माहिती घेण्यात आली. येत्या काही दिवसात याच पद्धतीने शिबिर आयोजित करत या सर्व दिव्यांग बांधवांना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कृत्रिम अवयव बसवून देण्यात येणार आहे. याच बरोबर यावेळी नवजीवन रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तसेच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी देखील या उपक्रमात सहभाग नोंदवत रक्तदान केले. सुमारे १०० बाटल्या रक्त यावेळी संकलित करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील, शहर सचिव आणि डोंबिवली विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष चव्हाण, युवासेनेचे सागर जेधे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि नागरिकांनी शिबिरात सहभाग नोंदविला.
.jpeg)
Post a Comment