Folowers

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम: कोकण विभागीय आयुक्त तथा मतदारयादी निरीक्षक रुबल अग्रवाल यांच्याकडून १४८ विधानसभा मतदारसंघाच्या कामकाजाचा आढावा

 


ठाणे(जिमाका):- मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत कोकण विभागीय आयुक्त तथा मतदारयादी निरीक्षक रुबल अग्रवाल यांनी १४८ विधानसभा मतदारसंघाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. 

     त्यांनी विशेष करून दावे व हरकतीबाबत प्राप्त झालेल्या अर्जांची पाहणी करत आतापर्यंतच्या प्रगतीचा लेखाजोखा घेतला.

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी निवडणूक प्रक्रियेत नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर, निवडणूक प्रक्रियेबाबत जास्तीत जास्त जनजागृती मोहीम राबवून नागरिकांना संपूर्ण प्रक्रियेची माहिती देण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले.    

    पात्र नागरिकांची नावे मतदारयादीत समाविष्ट करणे, वगळणे किंवा दुरुस्तीसंदर्भातील दावे-हरकती पारदर्शक पद्धतीने हाताळण्यावर आयुक्तांनी भर दिला.

    यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, कोकण विभागीय आयुक्त कार्यालयातील उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक आणि तहसीलदार प्रदीप कुडाळ यांच्यासह निवडणूक यंत्रणांचे इतर अधिकारी उपस्थित होते.

   शेवटी पुनरिक्षण कार्यक्रमाच्या कामात कोणतीही कसर सोडली जाऊ नये आणि प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी यंत्रणेने अधिक वेगाने व समन्वयाने काम करावे, अशा सूचना आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिल्या.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत