Folowers

‘चले जाव’नंतर आता हुकूमशाहीला ‘चले जाव’; काँग्रेसचा एल्गार !


ऑगस्ट क्रांती दिनी ठाण्यात काँग्रेसचा संविधान बचावाचा निर्धार; बेरोजगारी, महागाई आणि द्वेषाच्या राजकारणाविरोधात आवाज 

ठाणे : प्रतिनिधी

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात निर्णायक ठरलेल्या ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त ठाणे शहर काँग्रेसच्या वतीने स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. ९ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईतील ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानावरून महात्मा गांधी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ब्रिटिश सत्तेविरोधात ‘छोडो भारत’चा नारा देत ‘करा किंवा मरा’चा निर्धार व्यक्त केला होता. त्या ऐतिहासिक लढ्याची प्रेरणा घेऊन आज देशाची लोकशाही, संविधान आणि सामाजिक एकोपा अधिक मजबूत करण्याचा संकल्प करण्यात आला.


कोर्ट नाका येथील संविधानाच्या उद्देशिकेच्या शिल्पासमोर शेकडो काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून संविधानातील समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेची मूल्ये घराघरांत पोहोचविण्याची प्रतिज्ञा करण्यात आली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


यावेळी ठाणे काँग्रेस चे अध्यक्ष राहुल पिंगळे, खासदार कुमार केतकर,ज्येष्ठ नेते सुभाष कानडे, प्रदेश पदाधिकारी डॉ. गजानन देसाई, राजेश जाधव, मोहन तिवारी, प्रदेश सदस्य भालचंद्र महाडिक, मिलिंद खराडे, निशिकांत कोळी, धर्मराज्याचे राजन राजे, ॲड. प्रभाकर थोरात, महेंद्र म्हात्रे,सेवादलाचे रवींद्र कोळी यांच्यासह ब्लॉक अध्यक्ष,युवक काँग्रेस ,महिला आणि सर्व स्तरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या पिढीने देशासाठी बलिदान दिले; आता लोकशाही आणि संविधान मजबूत ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असा संदेश यावेळी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.

 देशहित आणि लोकशाहीच्या रक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत सरकारवर टीका केली. ते म्हणाले, “गांधीजींनी १९४२ मध्ये ब्रिटिशांना ‘चले जाव’चा संदेश दिला. आज देशासमोर बेरोजगारी, महागाई, सामाजिक द्वेष आणि लोकशाही मूल्यांसमोरील आव्हाने आहेत. त्यामुळे आजच्या काळातील खरे क्रांतिकार्य म्हणजे संविधानाची मूल्ये, लोकशाही, समता, बंधुता आणि न्याय यांचे संरक्षण करणे होय.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत