Folowers

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक

 


नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून, संसद भवनातील पंतप्रधान कार्यालयात (PMO) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांची गेल्या तासाभरापासून बैठक सुरू आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार, देशातील Gen Z पिढीची मानसिकता, अपेक्षा आणि राजकीय कल याबाबत आढावा घेण्यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA)तील महत्त्वाचे सहयोगी म्हणून एकनाथ शिंदे यांच्याशी पंतप्रधान यासंदर्भात सविस्तर चर्चा करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


याशिवाय, आगामी काळातील शिवसेनेची भूमिका, संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार, तसेच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह प्रकरणासंदर्भातील घडामोडी व पुढील रणनीतीबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत