ठाण्यातील सवाना टॉवरमध्ये ७७ वर्षीय महिलेचा २१ व्या मजल्यावरून पडून मृत्यू
ठाणे (प्रतिनिधी): ठाणे पश्चिमेतील माजीवाडा परिसरातील सवाना टॉवर येथे मंगळवारी ७७ वर्षीय महिलेचा २१ व्या मजल्यावरील गॅलरीतून तोल जाऊन पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.
ही घटना ०५/०८/२०२६ रोजी दुपारी ३:४५ वाजता घडली. वसंत लॉन्स, न्यू होरायझन स्कूल समोरील सवाना टॉवर(तळ+२३) मधील २१०१ नंबरच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या श्रीमती. कुमुधा रमेश शेट्टी (वय ७) या गॅलरीत असताना तोल जाऊन खाली *तळ+२ वरील पोडियमच्या सज्जावर पडल्या.
माहिती मिळताच वर्तक नगर पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे* पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ०१ फायर वाहन, ०१ रेस्क्यू वाहन, ०१ युटिलिटी वाहन, ०१ रुग्णवाहिका, ०१ शववाहिका आणि ०१ हायड्रोलिक वाहनाच्या मदतीने अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांनी मृतदेह सज्जावरून बाहेर काढला.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी *जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे* येथे पाठवला आहे. वर्तक नगर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Post a Comment