Folowers

रायलादेवी तलाव परिसरातील कामांचा आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आढावा

 


ठाणे  : रायलादेवी तलावाच्या सुशोभीकरण व विकासकामांचा आढावा घेण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात बैठक पार पडली. यात पहिल्या टप्प्यातील कामांची सद्यस्थिती आणि दुसऱ्या टप्प्याचे नियोजन, सुरक्षा व स्वच्छतेवर चर्चा झाली.


या बैठकीस कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा मीनल संख्ये, नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले, नगरअभियंता प्रशांत सोनग्रा, एमएमआरडीएचे मुख्य अभियंता विनय सुर्वे, उपायुक्त मधुकर बोडके आदी अधिकारी उपस्थित होते.


नगरसेविका नम्रता भोसले यांच्या निवेदनानुसार आयोजित या बैठकीत तलावाभोवती संरक्षक भिंत बांधून नंतर अंतर्गत कामे करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. परिसरात मद्यपी आणि गर्दुल्ल्यांचा वावर असल्याने पोलीस गस्त वाढविण्याचे निर्देशही देण्यात आले.


दुसऱ्या टप्प्यात तलाव परिसराचा सर्वांगीण विकास, सुरक्षा शेड, सुरक्षारक्षक नियुक्ती, स्वच्छतेसाठी स्वतंत्र यंत्रणा आणि विद्युत सुविधांतील त्रुटी दूर करण्याबाबत एमएमआरडीए अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. 


सीसीटीव्ही लवकर कार्यान्वित करणे, अतिक्रमण रोखणे, डेब्रिज हटविणे आणि एमएसईडीसीएलशी समन्वय साधून वीजपुरवठ्याची कामे पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत