Folowers

जिजाऊ संस्थेकडून पिवळी केंद्रातील ९ शाळांमधील १,०५० विद्यार्थ्यांना ३,१० मोफत वह्यांचे वितरण

 


शहापूर | प्रतिनिधी

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य सहज उपलब्ध व्हावे या उद्देशाने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत संपूर्ण कोकणात ३५ लाख मोफत वही वाटप अभियान राबवले जात आहे. याच अंतर्गत शहापूर तालुक्यातील पिवळी केंद्रातील ९ शाळांमध्ये मोफत वही वाटप कार्यक्रम संपन्न झाला.


या उपक्रमात खोर, पिवळी, वांद्रे, कोशिंबडे, रताळेपाडा, सावरोली, वेडवहाळ, वेहलोंडे येथील जिल्हा परिषद शाळांसह किल्लेमाऊली माध्यमिक शाळेतील १,०५० विद्यार्थ्यांना ३,१० मोफत वह्या देण्यात आल्या. उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.


यावेळी जिजाऊ संघटना शहापूर तालुका प्रमुख दिनेश निमसे, मुंबई म्युनिसिपल बँक संचालक भानुदास भोईर, कुणबी सेना प्रमुख जगन निपुर्ते यांच्यासह जिजाऊ संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.


मार्गदर्शन करताना दिनेश निमसे म्हणाले, "निलेश सांबरे यांच्या नेतृत्वाखाली जिजाऊ संस्था शिक्षण क्षेत्रात जनहिताचे उपक्रम राबवत आहे. विद्यार्थ्यांच्या हात वही देणे म्हणजे त्यांच्या भविष्याला बळ देणे आहे."



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत