ठाण्यातील ब्रम्हांडमध्ये घराचा भाग कोसळून 9 वर्षीय मुलाचा मृत्यू; 2 जखमी
मद्रास चाळीतील गॅलरी शेजारच्या घरावर पडली; 3 घरे रिकामी, धोकापट्टी लावली
ठाणे, 10 जुलै 2026: ठाणे पश्चिम येथील ब्रम्हांड, आझाद नगर परिसरात शुक्रवारी दुपारी घराचा भाग कोसळून दुर्दैवी घटना घडली. या अपघात 9 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले आहेत.
घटना कशी घडली?
ठा.म.पा. आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दि. 10/07/2026 रोजी दुपारी 3:35 वाजता वर्दी मिळाली. ब्रम्हांड, मद्रास चाळ, मिशनरी चैपल चर्च बाजूला असलेल्या तळ+1 मजली घराची गॅलरी बाजूला असलेल्या घरावर कोसळली. हे घर अंदाजे 25 ते 30 वर्षे जुने असून मालकी श्रीमती. मनिषा सावंत यांची आहे.
अपघाताच्या वेळी घरात झोपलेल्या 3 जणांवर गॅलरीचा भाग पडला.
मृत्यू व जखमींची नावे:
1. जयकुमार जयस्वाल, वय 12 वर्षे: गंभीर दुखापत झाल्याने सिव्हिल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
2. उर्मिला जयस्वाल, वय 35 वर्षे: डोक्याला दुखापत. मानपाडा येथील टायटन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू.
3. विनित जयस्वाल, वय 9 वर्षे: डोक्याला दुखापत. टायटन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू.
प्रशासनाची कार्यवाही
घटनास्थळी लोकप्रतिनिधी लहू पाटील, उपआयुक्त दिनेश तायडे, सहा. आयुक्त सोनल काळे, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वाय.एम. तडवी, कापूरबावडी पोलीस, अग्निशमन दल व आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान दाखल झाले.
सुरक्षेच्या कारणास्तव मद्रास चाळीतील 3 घरे तातडीने रिकामी करण्यात आली असून परिसरात धोकापट्टी लावण्यात आली आहे. पुढील कार्यवाही माजीवाडा प्रभाग समिती व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू आहे.

Post a Comment