Folowers

भिवंडीतील धोकादायक कोहीनूर इमारत कोसळली; 5 मजली इमारत जमीनदोस्त

 तालुक्यातील मौजे नारपोली येथे बालाजी नगर, गंगाराम वाडी येथील कोहीनूर इमारत (तळमजला अधिक चार मजले) पडल्याची दुर्घटना घडली आहे. ही इमारत भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेने यापूर्वीच धोकादायक घोषित केली होती.

     काल रात्री ११.०० ते ११.३० वाजताच्या दरम्यान बी ( B) विंग चा काही भाग कोसळला.ही इमारत भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेने यापूर्वीच धोकादायक घोषित केली होती. तरीही तिचे डागडुजीचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली.

   या इमारतीत एकूण ४८ खोल्या होत्या, (प्रत्येक मजल्यावर १२ खोल्या.) रात्री ८.०० ते ९.०० वाजता इमारतीतून कर...कर...कट...कट असा आवाज येत असल्याने काही कुटुंबांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र, काही लोक शिल्लक असताना व ते बाहेर पडत असतानाच इमारतीचा ‘बी विंग’ भाग अचानक कोसळला.

   या दुर्घटनेत अंदाजे 7 ते 8 लोक अडकले असून त्यामध्ये शामजी पाल (वय ४६), संतोष पांडे उर्फ मुन्ना (वय ४२), मिराज शेख (वय ३५) यांच्यासह काही कामगारांचा समावेश असून त्यांची नावे अद्याप समजली नाहीत.

    घटनास्थळी अग्निशामक दल, मंडळ अधिकारी श्री.भोजणे, भोईवाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी, माजी नगरसेवक भगवान टावरे तसेच स्थानिक नागरिक उपस्थित आहेत.    

      आपत्ती व्यवस्थापन व बचाव कार्यासाठी NDRF टीम व भिवंडी फायर टीम श्वानपथकाच्या सहाय्याने अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करीत आहेत. 

      घटनास्थळी २ ॲम्बुलन्स व १ जेसीबी उपलब्ध आहेत.

     प्रशासकीय स्तरावरून Rescue work व अन्य आवश्यक कार्यवाही सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत