मोटर सायकल चोरी करणा-या सराईत गुन्हेगाराच्या टोळीस अटक, एकुण आठ मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघड, सुमारे नऊ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत, कासारवडवली पोलीस ठाण्याची कामगिरी
ठाणे: कासारवडवली पोलीस ठाणेच्या हद्दीतुन मागील २ महीण्यांचे यांचे कालावधीत हिरानंदानी इस्टेट परिसरातुन रोडचे बाजुला पार्क केलेल्या रॉयल इनफील्ड हंटर बुलेट व सुझुकी बर्गमॅन या मॉडेलच्या मो / सा विशेषकरून चोरी होत असल्याने सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मा. श्री आशुतोष डुंबरे सो पोलीस आयुक्त ठाणे, डॉ. श्री. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह आयुक्त ठाणे, श्री. अशोक दुधे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, ठाणे यांनी मोटार वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे व प्रतिबंध करण्यातबाबत आदेशीत केलेले आहे. त्या अनुषंगाने श्री. प्रशांत कदम पोलीस उपआयुक्त परिमंडळ ५, व श्री. मंदार जवळे सहा. पोलीस आयुक्त, वर्तकनगर विभाग यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या.
मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कासारवडवली पोलीस ठाण्याचे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचे घटनास्थळ, आरोपी येणे जाणेचे मार्ग - हिरानंदानी इस्टेट, घोडबंदर रोड, मिरारोड, दहीसर, कांदीवली, अंधेरी, सांताक्रुझ या परिसरातील सुमारे १२० सिसिटिव्ही कॅमेरे फुटेज चेक करून आरोपीत हे दहीसर कांदीवली परिसरातील असल्याचे निष्पण केले होते, त्या परिसरातील गोपनीय बातमीदार यांचे मदतीने विशेष प्रयत्न चालु असतांना दिनांक ०७/०५/२०२६ रोजी तपास पथकातील पोलीस अंमलदार मनोज सकपाळ यांना कासारवडवली पोलीस ठाणे गु. र. नं २८६ / २०२६ या गुन्हयातील सुझुकी बर्गमॅन मो सा ही सांताकुझ मुंबई येथे विक्री करण्यासाठी येणार असलेची खात्रीलायक बातमी मिळाल्याने पोउनि नितीन हांगे, पोह सकपाळ यांनी स्थानिक सांताकुझ पोलीस ठाणेच्या अंमलदार यांचे मदतीने आरोपीत १) सोहेल अब्दुल शेख, वय २१ वर्षे, रा. शंभु शेठ चाळ, राजीवनगर, सांताक्रुझ (प), मुंबई. यांस सापळा लावुन ताब्यात घेतले, नमुद गुन्हयात त्यास अटक करून त्याचेकडुन मो / सा हस्तगत करून ३ मो / सा चोरीचे गुन्हे उघडकीस आणले.
नमुद आरोपीकडे केलेल्या तपासामध्ये मो / सा चोरी करण्या-या टोळीचा मुख्य सुत्रधार मिलींद मनोहर सावंत रा. कांदीवली मुंबई हा असल्याचे निष्पण झाल्याने त्याचा मिरारोड, मुंबई, कणकवली, वेंगुर्ले, देवगड, बंगलोर इत्यादी ठिकाणी शोध घेतला. दिनांक ०९/०६/२०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक नितीन हांगे यांना मिळालेल्या खात्रीलायक बातमीवरून त्यास दहीसर मुंबई येथे सापळा लावुन ताब्यात घेवुन नमुद गुन्हयात अटक करण्यात आली. तपासादरम्यान त्याने त्याचा साथीदार भुषण दिगंबर पुरी उर्फ राम गोस्वामी रा. नालासोपारा याचेसह कासारवडली पोलीस ठाणेतील ९ मोटारसायकल चोरी केल्याचे कबुली दिल्याने आरोपीस नालासोपारा येथे सापळा लावुन अटक करण्यात आली. दोन्ही आरोपीस दिनांक १५/०६/२०२६ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर आहे.
अटक आरोपीतांचे नाव पत्ता-
१) मिलींद मनोहर सावंत, वय ३० वर्षे, रा. ११४, रेणुका बिल्डींग, रेणुकानगर, चारकोप कांदिवली (प) मुंबई २) भुषण दिगंबर पुरी उर्फ राम गोस्वामी, वय ४६ वर्षे, रा. श्रेया वसतिगृह, नालासोपारा (प) जि. पालघर ३) सोहेल अब्दुल शेख वय २१ वर्षे, राह. शंभु शेठ चाळ, राजीवनगर, सांताकुझ (प) मुंबई.

Post a Comment