वडद हसोळची लेक फिजा मुकादमची भरारी: फॉरेन्सिक सायन्समध्ये गोल्ड मेडल जिंकून रचला इतिहास
वडीलांचे छत्र हरपले, पण आई-मामांच्या साथीने गाठले यशाचे शिखर; ग्रामीण मुलींसाठी बनली प्रेरणा
कोकणातील वडद हसोळ या छोट्याशा गावातून आलेल्या फिजा मुकादम हिने जिद्द आणि कष्टाच्या जोरावर फॉरेन्सिक सायन्समध्ये गोल्ड मेडल पटकावत आपल्या गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
लहान वयातच वडिलांचे छत्र हरपलेल्या फिजाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपले स्वप्न पूर्ण केले. आईने वडिलांची उणीव भासू दिली नाही तर मामांनी खंबीर पाठबळ दिले. नागपूर ते अमरावती अशा अनोळखी शहरांमध्ये हॉस्टेलमध्ये राहून तिने प्रत्येक संकटाशी दोन हात करत हे दैदिप्यमान यश संपादन केले.
"वादळे येतात उध्वस्त करायला नव्हे, तर तुमच्यातील ताकद पाहायला" या उक्तीला जागत फिजाने दाखवून दिले की गाव छोटे असले तरी स्वप्ने मोठी असू शकतात.
लवकरच ती देशाची आणि मराठी जनतेची सेवा करण्यासाठी सज्ज होत आहे. तिच्या या यशामुळे वडद हसोळसह संपूर्ण ग्रामीण भागातील मुलींना नवी प्रेरणा मिळाली आहे. कष्टाच्या जोरावर आभाळाला गवसणी घालता येते, हा संदेश तिने दिला आहे.
वडद हसोळ ग्रामस्थ आणि मराठी जनतेकडून फिजाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment