Folowers

गुरूवारी ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद




 ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा- मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. अलनिनो व आयओडीच्या प्रभावामुळे या वर्षी पावसाळा लांबण्याची शक्यता आहे. याबाबत जलसंपदा विभागाबरोबर दि.09/06/2026 रोजी झालेल्या आढावा बैठकीच्या निर्णयाप्रमाणे आगामी कालावधीत पाणी टंचाईची परिस्थ‍िती उद्भवू नये म्हणून 20% पाणी कपात करण्याचे ठरले आहे. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे जांभूळ जलशुध्दीकरण केंद्र येथून होणारा पाणीपुरवठा गुरूवार दि. 18/06/2026 रोजी दुपारी 12.00 वाजल्यापासून ते शुक्रवार दि. 19/06/2026 रोजी दुपरी 12.00 वाजेपर्यत एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद राहील.


            सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत्‍ दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. 26 व 31 चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समिती मधील सर्व भागामध्ये व वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. 2, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा 24 तासासाठी पूर्णपर्ण बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी.


            ठाणे महानगरपालिकमार्फत सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत