युवक काँग्रेसकडून पेट्रोल पंपावर मेलोडी वाटप
पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी ठाण्यात पेट्रोल पंपावर वाहनचालकांना मेलोडी चॉकलेट वाटले. “आवाज महाराष्ट्राचा, ठाण्याच्या परिवर्तनाचा” अभियानाचा प्रारंभ करताना मोरे यांनी भाजप सरकारवर टीका केली. “पेट्रोल 84 पैशांनी वाढले. मोदी परदेशात मेलोनीला मेलोडी देत आहेत, म्हणून आम्ही महागाईचे चॉकलेट वाटत आहोत”, असे मोरे म्हणाले. यावेळी शांभवी शुक्ला, लोकेश घोलप यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment