flowers

ठाणे पोलिसांची मोठी कारवाई: 34 कोटींचे हेरॉईन जप्त, 5 अटक

 


ठाणे पोलिसांनी आंतरराज्यीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. कल्याण अंमली पदार्थ विरोधी पथक आणि महात्मा फुले पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 9.7 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत 34.18 कोटी आहे. 


1 एप्रिल 2026 रोजी महात्मा फुले चौकात गस्तीदरम्यान दोन संशयितांना पकडले. त्यांच्याकडून 32.32 कोटींचे 9 किलो हेरॉईन आणि 39 हजार रोख जप्त केले. नंतर शहापूरमध्ये छापा टाकून आणखी 1.85 कोटींचे हेरॉईन सापडले.


या प्रकरणी मुख्य सूत्रधार अमजद युसूफ पठाण (नाशिक) सह 5 जणांना अटक केली. इतर आरोपी - कासिम वसाईकर (ठाणे), कृष्णा हळेमानी (मुंबई), गणेशन उर्फ अण्णा (71, मुंबई), सद्दाम शेख (कल्याण). अमजदवर मकोका, खून, ड्रग्ज तस्करीसह 20 गुन्हे आहेत. त्याला 1 जूनपर्यंत पोलीस कोठडी. 


पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली API अनिल गायकवाड व पथकाने कारवाई केली. आणखी आरोपींचा शोध सुरू 


#ThanePolice #DrugRacket #HeroinSeized #NDPS #Kalyan #CrimeNews #News27

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत