Folowers

राज्य सरोवर योजनेतून तलावांचा कायापालट, महापौर शर्मिला पिंपळोलकर यांचा 7 तलावांचा पाहणी दौरा


- राज्य सरोवर संवर्धन योजनेतून ठाण्यातील तलावांचे सुशोभीकरण होणार

- महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी बुधवारी कचराळी, सिद्धेश्वरसह 7 तलावांची पाहणी केली

- तलाव परिसरातील DP, केबल्स, शौचालय, उद्यानाच्या दुरावस्थेवरून अधिकाऱ्यांना सूचना

- अमृत 2.0 मधील 15 तलावांची कामे अंतिम टप्प्यात, आणखी 6 तलावांसाठी निविदा प्रक्रिया सुरू


ठाणे :राज्य सरोवर संवर्धन योजनेच्या माध्यमातून ठाण्यातील तलावांचा कायापालट होणार आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत कचराळी, सिद्धेश्वर, मखमली, ब्रह्माळा, घोसाळे, मदार्डे आणि गोकुळनगर अशा 7 तलावांचा पाहणी दौरा केला.

कचराळी तलावातील विद्युत DP हटवणे, इंटरनेट केबल्स काढणे आणि शौचालय स्वच्छतेच्या सूचना महापौरांनी दिल्या. सिद्धेश्वर तलाव परिसरातील उद्यानाच्या दुरावस्थेवरून त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मखमली तलावातील गाळ काढणे, ब्रह्माळा तलावात अतिरिक्त शौचालय, मदार्डे येथे विद्युत दिवे बसवण्याचे आदेश देण्यात आले.

"उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून तलाव संवर्धनाचे नियोजन सुरू आहे. पाहणीत आढळलेल्या त्रुटी दूर करण्यास सांगितले आहे," असे महापौर म्हणाल्या.

मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी सांगितले की, 'अमृत 2.0' अंतर्गत 15 तलावांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. राज्य सरोवर योजनेतून आणखी 6 तलावांचा विकास प्रस्तावित आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत