Folowers

प्रेमसंबंध ठेवत नसल्याच्या रागातून महिलेचा खून, आरोपीला गुन्हे शाखेकडून 24 तासांत अटक



भिवंडी :भिवंडी शहरात प्रेमसंबंधातून एका 33 वर्षीय महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुन्हे शाखा, घटक-2 भिवंडीने कौशल्यपूर्ण तपास करत 24 तासांच्या आत आरोपीला अटक करून गुन्ह्याची उकल केली आहे.


11 मे 2026 रोजी दुपारी 3 ते 12 मे रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान सरितादेवी विकास महतो, वय 33 वर्षे, यांचा खून करण्यात आला. आरोपी संजय मुकादम उर्फ द्वारकाप्रसाद वर्मा, 42 वर्षे, याने मयत महिलेने प्रेमसंबंध ठेवण्यास व फोनवर बोलण्यास नकार दिल्याने तिला स्वतःच्या रूमवर बोलावले. तेथे वाद झाल्यानंतर 11 मे रोजी दुपारी 3 वाजता तिचा खून केला. 


त्यानंतर रात्र होण्याची वाट पाहून 12 मे रोजी मध्यरात्री 2:30 वाजता मृतदेह प्लास्टिक पोत्यात भरून खांद्यावरून दुर्गा प्रसाद हॉटेलजवळील पद्मानगर येथील मोकळ्या मैदानात नेला. तेथे पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 301/2026, भा.न्या.सं. कलम 103, 283, 126, 371 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सीसीटीव्ही नसतानाही तपास यशस्वी

घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा घटक-2 चे वपोनि शितल राऊत व पथकाने घटनास्थळी भेट दिली. प्रथमदर्शनी कोणताही पुरावा नसताना पथकाने आजूबाजूच्या पावरलूम कारखाना व कामगार वस्तीत चौकशी केली. गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी द्वारिकाप्रसाद गिरीधारीप्रसाद वर्मा उर्फ संजय मुकादम, रा. पद्मानगर, भिवंडी, मूळ झारखंड याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने अटक करण्यात आली.


ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि शितल राऊत, सपोनि श्रीराज माळी, मिथुन भोईर आणि पथकाने केली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत