Folowers

बसमध्ये वृद्ध महिलेचे 12 तोळे सोने लंपास, गुन्हे शाखेने सराईत महिला चोरट्यांकडून 37 लाखांचे दागिने जप्त


ठाणे :बसमध्ये प्रवास करणाऱ्या वृद्ध महिलांच्या बॅगेतील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या सराईत महिला चोरट्यांच्या टोळीचा ठाणे गुन्हे शाखा, घटक-1 ने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 37 लाख 19 हजार रुपये किमतीचे 25 तोळे सोन्याचे दागिने जप्त करून चोरीचे 9 गुन्हे उघडकीस आणले आहेत.

काय आहे प्रकरण?

3 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता 72 वर्षीय अंजनी सूर्यवंशी या खारेगाव नाका ते ओझोन व्हॅली बसस्टॉप असा बसने प्रवास करत होत्या. त्यावेळी त्यांच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या तीन महिलांनी संगनमत करून त्यांच्या हातातील पिशवीमधून 12 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असलेली पर्स चोरली. याप्रकरणी कळवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सीसीटीव्हीच्या आधारे अटक

परिमंडळ-1 मध्ये असे गुन्हे वारंवार घडत असल्याने वरिष्ठांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. पोहवा संदीप महाडिक, प्रशांत लवटे, अमोल ढावरे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्याआधारे पो.उप निरी. प्रकाश शिरसाठ व पथकाने 1) संगीता दशरथ पीठकर, 45 वर्षे, रा. मुलुंड पश्चिम 2) सुरेखा बजरंग गायकवाड, 47 वर्षे, रा. मुलुंड पश्चिम या दोघींना 7 मे 2026 रोजी सापळा रचून अटक केली.

 वर्षांत 9 ठिकाणी हातसफाई

अटक आरोपींच्या चौकशीत त्यांनी गेल्या 2 वर्षांपासून कळवा, राबोडी, ठाणे नगर, नौपाडा पोलीस स्टेशन हद्दीत एकूण 9 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून 37.19 लाखांचे 25 तोळे सोने जप्त करण्यात आले आहे.

उघडकीस आलेले 9 गुन्हे:

1.  कळवा*: 6 गुन्हे - गु.र.नं. 124/2026, 919/2025, 169/2026, 256/2024, 847/2025, 361/2025

2.  *ठाणे नगर*: 1 गुन्हा - गु.र.नं. 08/2026

3.  *राबोडी*: 1 गुन्हा - गु.र.नं. 487/2025 

4.  *नौपाडा*: 1 गुन्हा - गु.र.नं. 620/2024


ही कामगिरी पोलीस उप आयुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि सचिन गायकवाड, पो.उप निरी. प्रकाश शिरसाठ, दिपक जाधव आणि पथकाने केली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत