flowers

कोपरीतील नालेसफाईंच्या कामांचा महापौरांनी केला शुभारंभ



 ठाणे, (30) कोपरी परिसरातील नालेसफाईच्या कामाचा शुभारंभ आज महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते करण्यात आला. ठाणे शहरातील विविध भागातील नालेसफाईच्या कामांना सुरूवात झाली असून आज कोपरी येथील बिम्सनाला येथून नालेसफाईच्या कामास सुरूवात करण्यात आली. पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची साफसफाई होईल या दृष्टीने नियोजन करून कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना महापौरांनी यावेळी दिल्या.


            या कार्यक्रमास स्थानिक नगरसेव‍िका मालती पाटील, नम्रता पमनानी, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी तसेच नौपाडा-कोपरी प्रभाग समितीतील स्वच्छता निरीक्षक, मुकादम आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


           उद्घाटनानंतर प्रत्यक्ष नाल्याच्या साफसफाईच्या कामाला सुरुवात करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांनी नियमित स्वच्छता आणि देखभाल ठेवण्यावर भर देत नागरिकांनीही स्वच्छतेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत