flowers

मोरया - इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट तर्फे ठाण्यात ५० वर्षांवरील कलाकारांसाठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन

ठाणे : खास 50 आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत,  उत्तरार्ध एकांकिका स्पर्धा भरवण्यात आली आहे.

   ह्या स्पर्धेचे आयोजन  मोरया - इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट करत आहेत. स्पर्धेच्या नियोजनात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, ठाणे शाखेचे विशेष सहकार्य लाभणार आहे. ही स्पर्धा केवळ स्पर्धा नसून खऱ्या अर्थाने वयाच्या उत्तरार्धात प्रवेश केलेल्या पन्नास वर्षांवरील कलाकारांसाठी एक हक्काचा रंगमंच आहे.

कलेला वय नसतं असं म्हणतात पण तरुणाईच्या जल्लोषात 50 आणि त्यापेक्षा जास्त वय असणार्‍या वयोगटाला एकांकिका सादर करण्याची संधी मिळावी आणि त्यातून सध्याच्या तरुणाईला त्यांच्या अभ्यासपूर्ण सादरीकरणाने शिकायला मिळावा ह्याच हेतूने ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. स्पर्धेची मूळ संकल्पना  रवी मिश्रा ह्यांची आहे. ह्या स्पर्धेद्वारे सध्याच्या जेन झी, जेन अल्फा च्या जमान्यातील तरुणांना भरपूर शिकायला मिळेल आणि मनाने तरुण असणार्‍या ज्येष्ठ कलाकारांकडून उत्तम एकांकिका सादर होतील असा विश्वास संस्था प्रमुख प्रफुल्ल गायकवाड ह्यांनी व्यक्त केला आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी २१ व २२ मार्च २०२६ रोजी होणार आहे. तर अंतिम फेरी २ एप्रिल २०२६ रोजी राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथे संपन्न होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०२६ आहे. स्पर्धेचा प्रवेश अर्ज आणि चौकशी साठी 9920137805 ( शिशिर ), 9167246833 ( कल्पिता ) या नंबर वर संपर्क करू शकतात. तसेच नवीन अपडेट साठी टीम मोरया च्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेज ला फॉलो करावे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी ह्या स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे . 

स्पर्धेचा विशेष नियम  - 

स्पर्धक संघातील लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांचे वय 50 पूर्ण किंवा त्यापेक्षा अधिक असावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत