flowers

आनंद नगर येथील धर्मवीर आनंद दिघेसाहेब चौकाचे लोकार्पण संपन्न


ठाणे,  : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आनंद नगर येथील धर्मवीर आनंद दिघेसाहेब चौक सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी (06 मार्च) उत्साहात संपन्न झाला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या चौकाचे लोकार्पण करण्यात आले असून महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी  उपमहापौर कृष्णा पाटील उपस्थित होते.


या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, स्थानिक नगरसेविका अनिता ठाकूर, उपअभ‍ियंता सुदर्शन मोरे, कार्यकारी अभ‍ियंता संजय कदम तसेच महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. आनंद नगर येथील ग्रँड स्क्वेअर सोसायटी जवळ हा चौक असून सुशोभीकरणामुळे परिसराचे सौंदर्य वाढण्यास मदत झाली असून हा परिसर नागरिकांना आकर्षित करत आहे.


परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून या चौकांचे सुशोभ‍िकरण करण्यात आले आहे. नागरिकांना आकर्षित होतील अशा पध्दतीने या चौकाचे सुशोभिकरण करण्यात आले असून मधोमध छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आली असून हे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. 



Off. Contact No. 022-25364779

....................................................................................

Official Website         -   www.thanecity.gov.in

E-mail              - publicrelationtmc@gmail.com

Twitter                         - @TMCaTweetAway

• Instagram                       - @smartcity_thane

• आपत्ती व्यवस्थापन कक्ष     - 1800-222-108/8657887101

• ============================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत