flowers

धाणेरा येथे आयोजित भव्य जैन दीक्षा महोत्सव (प्रवेश) कार्यक्रमाला आमदार संजय मुकुंद केळकर यांनी उपस्थित राहून दीक्षार्थींचे आशीर्वाद घेतले.

 


या पवित्र कार्यक्रमात मुमुक्षु कु. मानसीबेन आणि मुमुक्षु कु. जिनलबेन या जैन साध्वी दीक्षा स्वीकारणार आहेत. हा सोहळा पूज्य आचार्य श्री कल्पभूषणसागर सूरीश्वरजी महाराज यांच्या सान्निध्यात पार पडत आहे.

या प्रसंगी आमदार  संजय मुकुंद केळकर यांच्यासोबत भाजपा चे नगरसेवक सुनेश जोशी, नगरसेविका नम्रता कोळी, उषा वाघ, जयेंद्र कोळी, विशाल वाघ, शेखर पाटील तसेच दिनेश गोसर उपस्थित होते.

हा कार्यक्रम श्री टेंबीनाका अचलगच्छ जैन संघ (धाणेरा) यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाचे ठिकाण ज्ञानरथ कल विरति पाटिया, धाणेरा (वेस्ट) येथे आहे.

या आध्यात्मिक आणि प्रेरणादायी सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत