flowers

ठाण्यातील जांभळी नाका येथे चैत्र नवरात्रोत्सवाच्या देवीच्या मंडपाचे थाटात भूमिपूजन

 


ठाणे:ठाण्याचे वैभव असलेल्या जांभळी नाका येथील आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्रोत्सवाचा यंदाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात झाला. यंदाचे 31 वे वर्ष आहे.  श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात देवीच्या भव्य मंडपाचे भूमिपूजन शिवसेना नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांच्या हस्ते संपन्न झाले.


दरवर्षीप्रमाणे यंदाही या उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली असून, 'सर्वांच्या हाकेला धावणारी' अशी ख्याती असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी ठाणेकर सज्ज झाले आहेत. याप्रसंगी राजन विचारे यांच्या सोबत त्यांच्या पत्नी सौ. नंदिनी विचारे यांनी विधीवत पूजा करून आरती केली. त्यावेळी  उपजिल्हाप्रमुख ,प्रदीप शिंदे शहरप्रमुख अनिश गाढवे,ठाणे महापालिका नगरसेवक शहाजी खुस्पे, माजी नगरसेवक संजय दळवी, मंदार विचारे, मयूर पवार,  अशोक जाधव, महेंद्र पाटील,अमोल हिंगे,सचिन घाटवळ , व्यंकट कांबळे, प्रशांत सातपुते, राजू मोरे, धोंडू मोरे, रवी लोंढे, सुधीर बेलोसे महेश ढोमणे, विनायक आंबेकर, हेमंत व्यापारी,विनोद यादव, प्रशांत भुईमकर, वरून मानकामे,संजय कर्णिक, गफार मुजावर, दिनकर पाचंगे, अशोक घोलप, श्री वाघमारे, अरुण खेतले,महिला आघाडी प्रमिला भांगे, राजश्री सुर्वे,, अपर्णा भोईर, पांजारे मॅडम आणि इतर अनेक महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .


 *नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद* 

भूमिपूजन सोहळ्यादरम्यान शिवसैनिक, युवासेना आणि युवतीसेनेचे पदाधिकारी तसेच नागरिक  मोठ्या संख्येने उपस्थित होते. "जांभळी नाका येथील हा चैत्र नवरात्रोत्सव केवळ धार्मिक उत्सव नसून ती ठाण्याची एक परंपरा आहे," अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. नागरिकांनीही या सोहळ्याला मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे परिसरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते.

आगामी काळात होणाऱ्या नऊ दिवसांच्या उत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत