ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी 2013 मतदान केंद्रे सज्ज
ठाणे : ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान उद्या (15जानेवारी) होत आहे. निवडणुकीसाठी ठाणे महानगरपालिकेच्या 11 विभागात 2013 मतदान केंद्रे असणार आहे. या मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी 1,2 व 3, शिपाई व पोलीस नियुक्त करण्यात आले असून हे सर्व कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आले आहेत. 2013 मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर लागणाऱ्या सर्व साहित्याचे वाटप करण्यात आले असून 11 विभागातील सर्व केंद्रे मतदानासाठी सज्ज झाली असल्याचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी नमूद केले.
आज सकाळपासूनच प्रभाग क्रमांक 1,2,3,8 माजिवडा मानपाडा प्रभाग समितीतील न्यू होरायझन एज्युकेशन सोसायटी, इमारत सी, रोडाझ सोसायटीजवळ, हिरानंदानी इस्टेट, ठाणे प, प्रभाग क्रमांक 4,5,7 वर्तकनगर प्रभाग समितीतील ज्येष्ठ कवि साहित्यिक स्व. बाबूराव सरनाईक जिम्नॅशियम सेंटर, बेथनी हॉस्पिटलजवळ, पोखरण रोड नं. 2 ठाणे, प्रभाग क्रमांक 6,13,14,15 लोकमान्य सावरकर प्रभाग समितीतील महिला बचत गट भवन, कोरस हॉस्पिटलजवळ, ठाणे प, प्रभाग क्रमांक 16,17,18 वागळे इस्टेट प्रभागसमितीतील शासकीय तंत्रनिकेतन, वागळे इस्टेट, ठाणे (प.), प्रभाग क्र. 19,20,21,22 नौपाडा कोपरी प्रभाग समितीतील विद्या प्रसारक मंडळाचे पॉलिटेक्निकल कॉलेजची इमारत, ठाणा कॉलेज, तळमजला ठाणे, प्रभाग क्र. 10,11,12 उथळसर प्रभाग समितीतील होली क्रॉस हायस्कूल हॉल, के.व्हीला, ठाणे, प्रभाग क्र. 9,23,24,25 कळवा प्रभाग समितीतील सह्याद्री हायस्कूल, 4 था मजला, कळवा प, प्रभाग क्रमांक 26,31 मुंब्रा प्रभाग समितीतील मौलाना अबुल कलाम स्टेडियम, कौसा, बॅटमिंटन हॉल, तळमजला, मुंब्रा, प्रभाग क्रमांक 30, 32 मुंब्रा प्रभाग समितीतील मौलाना अब्दुल कलाम स्टेडियम, कौसा, पहिला मजला, मुंब्रा, प्रभाग क्रमांक 27,28 दिवा प्रभाग समितीतील मौलाना अब्दुल कलाम स्टेडियम, कौसा, प्रेक्षक गॅलरी, तळ मजला + प्रेक्षक गॅलरीची मागील बाजू (पहिला मजला) दक्षिण बाजूकडील सात गाळे, मुंब्रा प्रभाग क्रमांक 29,33 दिवा प्रभाग समितीतील मौलाना अब्दुल कलाम स्टेडियम, कौसा, प्रेक्षक गॅलरी, तळ मजला + प्रेक्षक गॅलरीची मागील बाजू (पहिला मजला) उत्तर बाजूकडील सात गाळे, मुंब्रा याठिकाणी त्या त्या विभागात असलेल्या मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले.
साहित्यवाटपाच्या ठिकाणापासून प्रत्येक पथकाला त्यांच्या मतदान केंद्रावर पोहचविण्यासाठी ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या 275 बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. सर्व पथके ही दुपारीच त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर पोहचली असल्याचे सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले. तसेच मतदान केंद्रावर पोहचल्यावर करावयाची कामे आदींबाबतची माहिती सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणामध्ये देण्यात आली असून त्या पध्दतीने मतदान केंद्रातील रचना करण्याबाबतची तयारी सर्व केंद्रावर पूर्ण झाली आहे.
उद्या (15 जानेवारी 2026) सकाळी 6.00 वा सर्व मतदान केंद्रावर उमेदवारांच्या प्रतिनिधीसमक्ष मॉकपोल घेण्यात येणार असून त्यानंतर सकाळी ठीक 7.30 वा. प्रत्यक्ष मतदानाला सुरूवात होणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून ठाणेकर नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने आपला मतदानाचा अधिकार बजावावा असे आवाहन महापालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Post a Comment