ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी 11 ठिकाणी होणार
ठाणे —ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक उद्या गुरूवार दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी होत आहे. या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवार दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी 11 विभागनिहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून मतमोजणी 16 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून खालील नमूद ठिकाणी होणार असल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी दिली.
प्रभाग क्रमांक 1,2,3,8 माजिवडा मानपाडा प्रभाग समिती
मतमोजणी : न्यू होरायझन एज्युकेशन सोसायटी, इमारत सी, रोडाझ सोसायटीजवळ, हिरानंदानी इस्टेट, ठाणे प
प्रभाग क्रमांक 4,5,7 वर्तकनगर प्रभाग समिती
मतमोजणी : ज्येष्ठ कवि साहित्यिक स्व. बाबूराव सरनाईक जिम्नॅशियम सेंटर, बेथनी हॉस्पिटलजवळ, पोखरण रोड नं. 2 ठाणे.
प्रभाग क्रमांक 6,13,14,15 लोकमान्य सावरकर प्रभाग समिती
मतमोजणी : महिला बचत गट भवन, कोरस हॉस्पिटलजवळ, ठाणे प
प्रभाग क्रमांक 16,17,18 वागळे इस्टेट प्रभागसमिती
मतमोजणी : शासकीय तंत्रनिकेतन, वागळे इस्टेट, ठाणे (प.)
प्रभाग क्र. 19,20,21,22 नौपाडा कोपरी प्रभाग समिती
मतमोजणी : विद्या प्रसारक मंडळाचे पॉलिटेक्निकल कॉलेजची इमारत, ठाणा कॉलेज, तळमजला ठाणे
प्रभाग क्र. 10,11,12 उथळसर प्रभाग समिती
मतमोजणी – होली क्रॉस हायस्कूल हॉल, के.व्हीला, ठाणे
प्रभाग क्र. 9,23,24,25 कळवा प्रभाग समिती
मतमोजणी – सह्याद्री हायस्कूल, 4 था मजला, कळवा प
प्रभाग क्रमांक 26,31 मुंब्रा प्रभाग समिती
मतमोजणी : मौलाना अबुल कलाम स्टेडियम, कौसा, बॅटमिंटन हॉल, तळमजला, मुंब्रा
प्रभाग क्रमांक 30, 32 मुंब्रा प्रभाग समिती
मतमोजणी : मौलाना अब्दुल कलाम स्टेडियम, कौसा, पहिला मजला, मुंब्रा
प्रभाग क्रमांक 27,28 दिवा प्रभाग समिती
मतमोजणी : मौलाना अब्दुल कलाम स्टेडियम, कौसा, प्रेक्षक गॅलरी, तळ मजला + प्रेक्षक गॅलरीची मागील बाजू (पहिला मजला) दक्षिण बाजूकडील सात गाळे, मुंब्रा
प्रभाग क्रमांक 29,33 दिवा प्रभाग समिती
मतमोजणी : मौलाना अब्दुल कलाम स्टेडियम, कौसा, प्रेक्षक गॅलरी, तळ मजला + प्रेक्षक गॅलरीची मागील बाजू (पहिला मजला) उत्तर बाजूकडील सात गाळे, मुंब्रा
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व सुरक्षित पार पाडण्यासाठी या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्तासह सीसीटीव्ही यंत्रणेचीही व्यवस्था करण्यात आली आहे. संबंधित प्रभागातील उमेदवारांचे प्रतिनिधी, मतमोजणी कर्मचारी तसेच अधिकृत अधिकारी यांना ठरलेल्या वेळेतच ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे

Post a Comment