अंमली पदार्थ तस्करी करणा-या आंतरराज्य टोळीच्या १४ आरोपी विरुध्द ठाणे पोलीस आयुक्तालयांकडुन मोक्का अन्वये दुसरी कारवाई


 २८/०८/२०२५ रोजी गुप्त बातमीदारा मार्फत एका निळया रंगाच्या बलेनो कारमधुन तीन ते चार इसम सुभाष चौक वालधुनी ब्रिज जवळ, कल्याण रेल्वे स्टेशन येथे बेकायदेशीर गांजा अंमली पदार्थ विक्री करीता येणार असले बाबत मिळालेल्या खात्रीशीर बातमी वरुन श्री. बलिरामसिंग परदेशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महात्मा फुले चौक पो.स्टे. व इतर अधिकारी अंमलदार तसेच कल्याण शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.झोडगे व त्यांचे सोबतचे अधिकारी व अंमलदार यांनी सयुंक्तपणे मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने छापा कारवाई करीता दोन स्वतंत्र पथक तयार करुन १७.०० वाजताचे सुमारास महात्मा फुले चौक, कल्याण रेल्वे स्टेशन कडे जाणारा रोड, कल्याण (प.) जि. ठाणे येथे निळया रंगाची सुझुकी बलेनो कार कं. छत्तीसगड ०८ एएम ९४०१ मधुन कल्याण परिसरात गांजा विक्रीकरीता आले असता पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग केला असता त्यांनी पो.कॉ./८२६१ सोनवणे हे सरकारी गणवेशात असतांना सुध्दा त्याचे अंगावर गाडी घालुन त्यांना जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला व पोलीसाचे शासकीय कामात अडथळा आणुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला नमुद पोलीस पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बलेनो कार कंमाक छत्तीसगड ०८ एएम ९४०१ हिचे सह ०१ इसमास ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यात सदर कारमध्ये ३५ किलो ४०० ग्रॅम गांजा अंमली पदार्थ व एक गावठी पिस्तुल मिळनु आल्याने महात्मा फुले चौक पो.स्टे. गु.र.नं. ९४८ / २०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, १३२,३(५) सह एन.डी.पी.एस. कायदा कलम ८ (क), २० (ब), पप (क), २९ सह आर्म अॅक्ट कलम ३,२५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१), १३५ प्रमाणे दिनांक २९/०८/२०२५ गुन्हा दाखल करणेत आला होता.


नमुद बेलेनो कार व मुद्देमाल सह ताब्यात घेण्यात आलेला आरोपीचे नांव खालील प्रमाणे

१. मोहम्मद सरफराज मोहंमद आसिफ, वय ५० वर्षे, रा. ठाकुर प्लॉट, झोपडपट्टी, बडा ताजबाग, ताजुद्दीन बाबा दर्गा जवळ, नागपुर

वरिल नमुद आरोपीत याचे सोबत कारमध्ये असलेले त्याचे साथीदार अटक केलेले आरोपींचे नांवे खालील प्रमाणे

१. मोहम्मद सोहेल उर्फ भुऱ्या मो. रफिक शेख, वय २४ वर्षे, राह. नागसेन -१, संजयबाग कॉलनी, पाण्याच्या टाकीजवळ, यशोधरानगर, नागपुर, जि. नागपुर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत