ठाण्यात रंगणार ६४वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा १० नोव्हेंबरपासून

महाराष्ट्राच्या नाट्यचळवळीत मोलाचे स्थान असलेल्या ठाण्यात यंदाही तेवढ्याच उत्साहात ६४ वी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी १० नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान रंगणार असून ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर मिनी नाट्यगृह येथे ती संपन्न होणार आहे. ठाण्यातील ज्येष्ठ रंगकर्मी, साहित्यिक, मान्यवर कलाकार ह्यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा उद्घाटन सोहळा १० नोव्हेंबरला संध्याकाळी ७ वाजता पार पडेल.


अ‍ॅमॅच्युअर थिएटर, नागोठणे या संस्थेच्या “ ईश्वरसाक्ष ” या नाटकाने स्पर्धेचा शुभारंभ होईल.  


सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक श्री.विभीषण चवरे यांनी नमूद केलेले आहे.  


यंदा या स्पर्धेमध्ये एकूण २३ संघांचा सहभाग असून ठाणे , रायगड आणि पालघर जिल्ह्याचे संघही या स्पर्धेत सहभागी होतील. ठाण्यातील रंगकर्मी प्रफुल्ल गायकवाड ठाणे केंद्राचे समन्वयक म्हणून काम पाहतील.. स्पर्धेतील सर्व नाटकांना रसिकप्रेक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित दर्शवत या नाट्यचळवळीला आपला पाठिंबा दर्शवावा हे आवाहन श्री. विभीषण चवरे यांनी केले आहे..

संपर्क - 

ठाणे केंद्र समन्वयक - प्रफुल्ल गायकवाड 

9004912468


यंदा स्पर्धेत सादर होणारी नाटकं आणि संस्था : 


ईश्वरसाक्ष

(अ‍ॅमॅच्युअर थिएटर, नागोठणे),


तिसरी घंटा

(अनंत सांस्कृतिक कलामंच, पेंझारी अलिबाग),


एक वजा क्षण

(ज्ञानदीप कलामंच ठाणे),


स्वस्तिकाची ट्रॅजेडी

( ज्ञानसाधना नाट्यपरिवार , ठाणे ),


डबल बॅटरी

( गजानन नाट्य संस्था, ठाणे ),


डाळ में कुछ काळा है

कलारंग सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था

 

दोघी

( कल्पवृक्ष सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था , अलिबाग ),


इतना सन्नाटा क्यों हैं भाई?

( महाराष्ट्र लोककल्याणकारी सेवासंस्था , नवीन पनवेल ),


ढाई अक्षर प्रेम के

( मुलुंड शिक्षण प्रसारक मंडळ , मुंबई),


ओय ले ले 

(नवरस कलारंग सांस्कृतिक अकादमी , बोईसर ),


थर्टी सिक्स्टी नाईंटी

( प्रजाहित प्रतिष्ठान ),


डिस्टोपिया

( राहुल एज्युकेशन संस्था ),


वय थोडं जास्त आहे

( रंगसंपदा ठाणे ),


बाप पण भारी देवा

( रंगमित्र सांस्कृतिक कला मंडळ, इंदापूर ) 


सवंगाचा सारथी

( रंगसेवा सांस्कृतिक मंडळ, अलिबाग ), 


द शो मस्ट गो ऑन

( सारथी फाउंडेशन ),


कर मर कर हौस

(सक्षम एज्युकेशन ट्रस्ट), 


नारायणी

( श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ ), 


मृगजळ

( स्पंदन नाट्यकला , क्रिडा , शैक्षणिक मंडळ , रोहा )


डोंगरार्त

( सुस्वानंद कला प्रतिष्ठान ),


किरण धर्माधिकारी कोण? ( सुहासिनी नाट्यधारा, महाड, रायगड ), 


लाईफ स्टाईल

( वरद विनायक सेवा संस्था ),


ऑक्सिजन

( योगायोग कला सेवा संस्था ,ठाणे ).

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत