युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या हस्ते ऐरोली व वाशीतील महाविद्यालयांमध्ये कक्षांचे उद्घाटन



नवी मुंबई : तरुणांशी थेट संवाद साधत त्यांच्यात सामाजिक भान, नेतृत्वगुण निर्माण व्हावे या उद्देशाने युवासेनेतर्फे ऐरोली आणि वाशी परिसरातील विविध महाविद्यालयांमध्ये युवासेना कक्षांचे उद्घाटन युवासेना कार्याध्यक्ष श्री. पुर्वेश सरनाईक यांच्या हस्ते पार पडले.


ऐरोलीतील दत्ता मेघे, जे. व्ही. एम. मेहता, एन. एच. एस., आणि एस. डी. व्ही. महाविद्यालय तसेच वाशीतील टिळक, मॉडर्न  आणि फादर एग्नेल महाविद्यालयात येथे हे युवासेना कक्ष सुरू झाले आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना संघटनाशी जोडले जाण्याची, समाजकार्यात प्रत्यक्ष सहभाग घेण्याची संधी मिळणार आहे.


या प्रसंगी युवासेना कार्यकारिणी सदस्य ममित चौगुले, युवासेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख अनिकेत म्हात्रे, कॉलेज कक्ष सदस्य ओमकार चव्हाण आणि ओमकार ठक्कर पाटील उपस्थित होते. 


या नव्या कक्षामुळे युवासेनेचं तरुणांशी नातं आणखी दृढ झालं असून, त्यांच्या स्वप्नांसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी युवासेना नेहमीच त्यांच्या पाठीशी उभी राहील, तरुणांच्या विचारांना योग्य दिशा देणे आणि त्यांच्या क्षमतेला समाजकारणाशी जोडणे हेच युवासेनेचं खरं ध्येय आहे. प्रत्येक महाविद्यालयातील युवासेना कक्ष हे त्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. असे युवासेनेचे कार्याध्यक्ष  श्री. पुर्वेश सरनाईक यांनी सांगितले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत