ठाण्यात रोटरी महिन्याचे आयोजन.


हेरिटेज प्रकल्प आणि सामाजिक उपक्रमांद्वारे नागरिकांशी साधणार संवाद.


ठाणे : ठाण्यात रोटरी क्लबच्यावतीने रोटरी महिना साजरा करण्यात येणार असून या उपक्रमाची सुरुवात १५ नोव्हेंबरपासून होणार आहे. या उपक्रमांतर्गत ठाण्यातील ३६ रोटरी क्लब सहभागी होणार असून उपेक्षित घटकांपर्यंत मदत पोहोचवण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. या आठवड्यात ‘हेरिटेज’ प्रकल्प राबवला जाणार असून यामध्ये किल्ल्याची स्वच्छता, जुन्या वारसा स्थळांची माहिती व त्यांचे संवर्धन यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. तसेच या ‘हेरिटेज’ प्रकल्पाद्वारे नागरिकांना प्राचीनकालीन गड - किल्ले, वस्तू, आदी गोष्टींबाबत माहिती देण्यात येणार आहे.


          दरम्यान या कार्यक्रमाची सुरुवात १५ नोव्हेंबर रोजी ठाण्यात होणार असून काशिनाथ घाणेकर नाट्य गृह येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. दरम्यान १६ नोव्हेंबरला कल्याणमध्ये देखील विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या रोटरी आठवडा कार्यक्रमाअंतर्गत नवी मुंबईत ६० कंपनी एकत्र येत नोकरी मेळा आयोजित करणार आहे. तसेच ठाण्यातील 3 ते 4 रोटरी क्लब 5 ते 10 ठिकाणी नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान ठाकुर्ली येथे हेरिटेज प्रकल्पातून जुन्या स्थळांची माहिती गोळा करण्यात आली असून  कोपरी खाडी येथील टोफ आणि जुने जेल यांची माहिती तरुण पिढीस या उपक्रमाअंतर्गत दिली जाणार आहे.


         तसेच "हेरिटेज रन मॅरेथॉन" या उपक्रमातून या पुढील उपक्रमांसाठी निधी संकलन करण्यात आला आहे. तसेच कल्याणमध्ये रोटरी क्लबने चेक डॅम बांधले असून उल्हासनगरमध्ये २० ते ४० मुलांना आणि कल्याणमध्ये ६३ ते ६४ मुलांना मोफत रक्तदान करण्यात आले आहे. या उपक्रमांना शासनाचे देखील सहकार्य लाभले आहे. या प्रकल्पांतर्गत हेरिटेज संवर्धन, नोकरी मेळा व सामाजिक उपक्रम राबवले जाणार असून ज्यामुळे शहरातील नागरिकांवर सकारात्मक परिणाम होणार असल्याचं मत आयोजकांनी व्यक्त केले. यावेळी रोटरी इंटरनॅशनलचे प्रमुख (जिल्हा गव्हर्नर) हर्ष मकोल, ठाणे वैभव संपादक व रोटरी सदस्य मिलिंद बल्लाळ उपस्थित होते.


          पूर्ण एक वर्ष रोटरी क्लबतर्फे साजरा केला जात असून यावेळी उपक्रमांतर्गत अनेक क्लब एकत्र येत असून ४००० पेक्षा जास्त सदस्य सामाजिक उपक्रम करत असतात. तसेच या उपक्रमाची सुरुवात १५ नोव्हेंबर पासून होणार असून यामध्ये रोजगार मेळावे , सरकारी  खात्यांशी सुसंवाद, हेरिटेज वॉक उपक्रम, आदी योजनांचा  समावेश आहे. यात संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील विविध भागात नोकरी मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार असून "आभा कार्ड" या योजनेचा लाभ कसा घ्यावा या संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. दरम्यान सुसंवाद उपक्रमांतर्गत ठाणे, कल्याण, नवी मुंबई , भिवंडी, बदलापूर, अंबरनाथ , उल्हासनगर या ठिकाणची क्लब सेवा महिन्यात  योजना राबवतील.तसेच हेरिटेज वॉक या उपक्रमांतर्गत ठाण्यातील व विविध भागातील प्राचीन वास्तू आणि वस्तूंबद्दल नागरिकांना व विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येणार असल्याचे रोटरी इंटरनॅशनलचे ३१४२ चे गव्हर्नर हर्ष मकोल यांनी सांगितले.


            रोटरीतर्फे १२० क्लब ठाण्यात असून साडेचार हजार विविध उपक्रम रोटरीयंस करत असतात. दरम्यान हा महिना रोटरी महिना म्हणून साजरा करण्यात येणार असून हे 120 क्लबच्या माध्यमातून पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये काम सुरू करण्यात येणार आहे. ज्यामध्ये हेरिटेज, थॅलेसिमिया, जॉब फेर, शहरी समस्या, आभा कार्ड, सुसंवाद या विविध उपक्रमाद्वारे विविध समस्यांवर व जनजागृती संदर्भात कार्य केले जाणार आहे. तसेच या उपक्रमाला ठाणे शहराचे अधिकारी, वाहतुक पोलीस उपायुक्त, ठाणे महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, आदी मान्यवर उपस्थिती दर्शवणार आहेत. रोटरीला 120 वर्षे पूर्ण झाले असून ठाण्यात देखील रोटरीचे  सामाजिक प्रकल्प सातत्यने राबवले जातात. सामान्य नागरिकांना रोटरीमध्ये सहभागी होण्यास इच्छुक असल्यास त्यांचे स्वागतच असेल असे श्री मकोल म्हणाले.  संपूर्ण जिल्ह्यात सुमारे १२० क्लबच्या मार्फत ४५०० रोटरी सदस्य अविरतपणे लहान मोठे समाजोपयोगी प्रकल्प राबवत असतात असे ठाणेवैभव संपादक व ज्येष्ठ रोटरी सदस्य मिलिंद बल्लाळ यांनी सांगितले. जिल्हा समन्वयक सतीश माने यांनीही रोटरीच्या कामकाजाबद्दल माहिती दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत