ठाणे सिव्हील रुग्णालयात बाल डायलेसिस केंद्र उभारणीच्या दृष्टीने पाहणी



ठाणे: कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय ॲड. निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत ठाणे सिव्हील रुग्णालयात मंजूर झालेल्या बाल डायलेसिस केंद्राच्या उभारणीसाठी प्राथमिक पाहणी करण्यात आली.


विधानपरिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री माननीय श्री. प्रकाश आबिटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. जुलै महिन्यात सादर करण्यात आलेल्या निवेदनावर त्यांनी या महत्त्वाच्या प्रकल्पाला तात्काळ मंजुरी दिली होती.


प्रकल्पाच्या प्रगतीचा आणि पुढील टप्प्यांचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस माननीय आमदार ॲड. निरंजन डावखरे, ठाणे सिव्हील रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, बालरोगतज्ञ व नेफ्रोलॉजिस्ट डॉ. उमा अली (वाडिया हॉस्पिटल), बालरोगतज्ञ डॉ. परमानंद, डॉ. शानबाग (सायन हॉस्पिटल) तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


त्यानंतर ठाणे सिव्हील रुग्णालयात प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक पायाभूत सुविधा, वैद्यकीय साधनसामग्री, केंद्राचे आराखडे, वैद्यकीय उपकरणे, बांधकाम संरचना, सुविधा, मनुष्यबळ आणि डायलेसिस केंद्राच्या कार्यप्रणालीबाबत सविस्तर मार्गदर्शन अशा घटकांवर सखोल चर्चा करण्यात आली.


हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर ठाणे सिव्हील रुग्णालय हे ठाणे, पालघर, तळ कोकण आणि गोव्याच्या वेशीपर्यंतच्या बालरुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.


मिळालेल्या प्रतिसाद आणि कामाच्या गतीस पाहून आनंद व्यक्त करताना ॲड. निरंजन डावखरे म्हणाले, "माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारचे आरोग्य धोरण सर्वसमावेशक असून ही विकासाच्या दिशेने सुरू झालेली वाटचाल आहे, कारण 'निरोगी भारत, सशक्त भारत!'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत