माणुसकीची भावना जपणाऱ्या रिक्षाचालक इब्राहीम खलिफे यांचा राजापूर पोलिसांकडुन सत्कार

 

 राजापूर / प्रतिनिधी -    काही दिवसापुर्वी महामार्गावर वृध्द महिलेला मारहान करत झालेल्या लुटीच्या घटनेवेळी राजापूर शहरातील रिक्षा चालक इब्राहीम खलिफे यानी मानुसकीची भावना जोपासत सदर महिलेला वेळीच ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते . त्यानी दाखवलेली ही तत्परता व माणुसकीची भावना याची दखल घेत राजापूर पोलिसानी इब्राहीम खलीफे यांचा शाल देवुन सन्मान केला आहे . 

             02/10/2025 रोजी सायंकाळी 06.00 वाजता दरम्यान मुंबई गोवा हायवे वरील गंगातिर्थ  होम रेस्टच्या पुढील वळणावर  सौ रश्मी प्रभाकर चव्हाण वय 65 वर्षे राहणार कोदवली तरळवाडी तालुका राजापूर या वयोवृद्ध महिलेला एक अज्ञात कारचालक यांनी मारहाण करत  दुखापत करून  घटनास्थळावरून पळून गेलेला होता. त्याच मदुतीत राजापूर शहरातील रिक्षा चालक इब्राहिम खलिफे हे रिक्षातील भाडे सोडुन राजापूर मध्ये येत असताना  रस्त्यावरील प्रसंग पाहून सदरच्या महिलेला तात्काळ आपल्या रिक्षात बसवून  उपचारा करता ग्रामीण रुग्णालय राजापूर येथे दाखल केले होते . खलिफे यानी  केलेल्या सहकार्याबद्दल व कार्यतत्परतेबद्दल  राजापूर पोलीस ठाणे यांच्या वतीने पोलीस निरीक्षक अमित यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपज्योती पाटील, पोलिस उपनिरीक्षक सुधीर उबाळे यांनी पोलीस ठाणे येथे इब्राहिम खलिफे यांचा शाल श्रीफळ देऊन  सत्कार केला .त्यांनी वयोवृद्ध महिलेची गंभीर परिस्थिती पाहून माणुसकीच्या भावनेतून केलेल्या कामगिरीची  पोलीसांनी दखल घेऊन पोलीस ठाणे स्तरावर योग्य सन्मान केलेला  आहे.

पोलीस ठाणे हद्दीत तसेच मुंबई गोवा महामार्गावर अपघात अथवा अनुचित प्रकार घडल्यास नागरिकांनी पुढाकार घेऊन मदत करण्याचे आवाहन पोलिसांनी केलेले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत