गायमुख ते कल्याण फाटापर्यंत ठाणे महानगरपालिकेने सोमवारी राबवली सर्वंकष स्वच्छता मोहीम


ठाणे  : दिवाळीच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेतर्फे गायमुख ते कल्याण फाटा या महामार्गावर सोमवारी सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 


 या मोहिमेत, संपूर्ण महामार्गाची स्वीपिंग मशीनद्वारे साफसफाई करण्यात आली. त्याचवेळी या संपूर्ण पट्ट्यात एकूण ३०० सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीनेही सफाई करण्यात आल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली.


या सफाई मोहिमेत एकूण तीन डंपर भरून कचरा उचलण्यात आला. या मोहिमेत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त मनीष जोशी, सहाय्यक आयुक्त  सुनील मोरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक शयूराज कांबळे, मुख्य स्वच्छता निरीक्षक मयुरी अंबाजी यांच्यासह उपमुख्य स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, सफाई कामगार सहभागी झाले होते. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत