ठाण्यातील मनोरुग्णालयात आगळीवेगळी दिवाळी साजरी — सामाजिक कार्यकर्ते राजेश लोखंडे आणि नेहल छेडा यांचा उपक्रम
ठाणे : ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते राजेश हिरामण लोखंडे*l आणि नेहल छेडा यांच्या वतीने आज ठाणे मनोरुग्णालयात रुग्णांना दिवाळी फराळाचे वाटप करून आगळीवेगळी दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे खाजगी सचिव मंगेश शिंदे, तसेच सन्माननीय आरोग्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक रतन लोखंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते राजेश लोखंडे हे नेहमी विविध समाज उपयोगी कामे करत असतात त्या उपक्रमाचाच एक भाग म्हणून दरवर्षी त्या दिवाळीची सुरुवातया विशेष उपक्रमात मनोरुग्णालयातील **सुमारे ७०० रुग्णांना दिवाळीनिमित्त फराळाचे वाटप** करण्यात आले. समाजसेवेची परंपरा जपत राजेश लोखंडे आणि नेहल छेडा दरवर्षी मनोरुग्णालयातील रुग्णांसोबत दिवाळी साजरी करतात आणि त्यांना फराळाचे वितरण करतात.
या उपक्रमाचे कौतुक करत मंगेश शिंदे म्हणाले की, “राजेश लोखंडे दरवर्षी अशा पद्धतीने समाजासाठी कार्य करत असतात. पुढेही हा उपक्रम असाच सुरू राहावा आणि आम्हालाही दरवर्षी या आनंदात सहभागी करून घ्यावे,” असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी रुग्णालयाची पाहणी करून रुग्णालयामध्ये चालणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती सुद्धा घेतली

Post a Comment