ठाण्याच्या शिरपेचात मनाचा तुरा
मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून संदेश दादासाहेब पाटील यांनी घेतली शपथ
ठाणे - ठाण्याचे रहिवासी असलेले जेष्ठ अनुभवी वकील संदेश दादासाहेब पाटील यांनी नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर यांनी संदेश दादासाहेब पाटील यांना शपथ दिली.
मूळचे सांगलीचे असलेले संदेश दादासाहेब पाटील हे गेली २६ वर्ष वकिली पेशात कार्यरत आहेत. १९९९ पासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. घोडबंदर येथील ते रहिवासी असून चरई विभागात त्यांचे अनेक वर्षांपासून कार्यालय आहे. मुंबई युनिव्हर्सिटी मधून बीकॉम, एलएलबी, एलएलएमचे शिक्षण त्यांनी घेतले आहे. आता पर्यंत ४००० पेक्षा अधिक खटले त्यांनी हाताळलेले आहेत. क्रिमिनल, सिव्हिल खटल्यांमध्ये अनुभवी वकील म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. सीबीआय, एनआयए, ईडी, एफसीए, एसआरए या केंद्रीय संस्थांसाठीसुद्धा संदेश दादासाहेब पाटील यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावलेली आहे. संदेश दादासाहेब पाटील यांच्या नियुक्ती बद्दल सर्वस्थरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment