दिव्यात इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून पडून कामगार महिला ठार.

 



ठाणे ता १२ सप्टें : दिवा शहरातील अधिकृत बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून पडून कामगार महिला ठार झाल्याची घटना घडली आहे. दिवा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकासमोरील चंद्रागण रेसिडन्सी या अधिकृत बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या १२ व्या मजल्यावरुन महिला कामगार डक मध्ये पडल्याने सदर मजदूर महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रसंगी घटना स्थळाहून सदर महिलेचा मृतदेह पुढील कारवाईसाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवला असून पुढील तपास मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत वपोनि अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवा पोलीस करत आहेत.


 दिवा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकासमोरील चंद्रागण रेसिडन्सी फेज ४ या अधिकृत बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या १२ व्या मजल्यावर ललिता ठाकूर (वय 35 ) मुळ राहणार गुलबर्गा, कर्नाटक या काल दुपारच्या दरम्यान काम करत असताना पडल्याने गंभीर जखमी झाल्याने त्यांचा अंत झाला. त्यांच्या पश्चात पती व तीन मुले असून प्रकरणी पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया सुरु केली असून पुढील तपास दिवा पोलीस करत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत