राहुल पिंगळे यांची पुणे विधानसभा प्रभारीपदी नियुक्ती
रस्त्यावर लढणाऱ्या राहुल पिंगळे यांच्यावर काँग्रेस नेतृत्वाचा विश्वास
ठाणे (प्रतिनिधी): काँग्रेस पक्षाचे निष्ठावान आणि कार्यतत्पर पदाधिकारी अशी ठाम ओळख असलेले राहुल पिंगळे यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने मोठा सन्मान देत नवी जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या राजकीय कामगिरीचा आणि पक्षाशी असलेल्या निष्ठेचा गौरव म्हणून त्यांची पुणे जिल्ह्यातील 214 पुणे कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणांसाठी स्वतःला वाहून घेणारे राहुल पिंगळे हे सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी नेहमीच आक्रमकपणे उभे राहिले आहेत. ओबीसी विभाग अध्यक्षपदाच्या काळात त्यांनी ओबीसींच्या हक्कांसाठी भव्य रॅली आणि तीव्र आंदोलने उभारून ठाणे जिल्हा काँग्रेसला नवे बळ दिले.
सध्या पक्षाचे मुख्य प्रवक्ते म्हणून ते माध्यमांमध्ये काँग्रेसची बाजू ठामपणे मांडत असून, चर्चांमध्ये प्रभावीपणे सहभाग घेतात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी ठाणे लोकसभा समन्वयक म्हणून नेतृत्वाची छाप पाडली.
प्रदेश काँग्रेसने जाहीर केलेल्या नव्या यादीत पुणे कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून राहुल पिंगळे (ठाणे) यांचीही निवड झाली असून, वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांच्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र देण्यात आले.या नव्या जबाबदारीमुळे राहुल पिंगळे यांच्यावर पक्ष संघटना मजबूत करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

Post a Comment