पशुपालकांसाठी अनुदानित योजनांच्या अर्ज सादरीकरणास मुदतवाढ; ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज करता येणार


(जिल्हा परिषद, ठाणे) – जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत पशुसंवर्धन विभागामार्फत पात्र पशुपालकांसाठी राबविण्यात येत असलेल्या ३ महत्त्वाच्या योजनांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. पूर्वी निश्चित केलेली १४ ऑगस्ट २०२५ ही अंतिम तारीख वाढवून आता ३१ ऑगस्ट २०२५ करण्यात आली आहे.


*योजना*

1. ५०% अनुदानावर एक संकरित गाय / म्हैस वाटप योजना

2. ५०% अनुदानावर (५+१) स्थानिक जातीचा शेळी गट वाटप

3. ६०% अनुदानाने तबेलाधारकांसाठी रबरी मॅट, कडबाकुट्टी यंत्र, मिल्किंग मशीन पुरवठा योजना


           डॉ. वल्लभ जोशी, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग यांनी सांगितले की, “जिल्ह्यातील पात्र पशुपालकांनी या संधीचा लाभ घ्यावा. शासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याचा उपयोग करून आपला व्यवसाय विस्तारावा आणि शाश्वत उपजीविकेच्या दिशेने पाऊल टाकावे. मुदतवाढीमुळे अधिकाधिक पशुपालकांना अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध होईल.”


*अर्ज सादरीकरणाची सुधारित वेळापत्रक:*

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: ३१ ऑगस्ट २०२५

तालुका स्तर पडताळणी: १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर २०२५

जिल्हा स्तर पडताळणी: ८ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०२५


*अर्ज प्रक्रिया:*

पात्र लाभार्थ्यांनी https://zpthaneschemes.com या जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. संकेतस्थळावर योजनांचे तपशील, पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्रांची यादी उपलब्ध आहे.


            जिल्हा परिषदेच्या वतीने सर्व पशुपालकांना आवाहन करण्यात येते की, या योजनांद्वारे उपलब्ध होणाऱ्या अनुदानाचा लाभ घेऊन आपल्या व्यवसायाला चालना द्यावी आणि उत्पन्नवाढीच्या दिशेने वाटचाल करावी.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत