घरोघरी तिरंगा उपक्रमातंर्गत महापालिकेच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन
ठाणे, : 79 व्या स्वातंत्र्यादिनानिमित घरोघरी तिरंगा या उपक्रमातंर्गत ठाणे महापालिकेच्या माध्यमातून देशभक्तीपर गीते, नृत्य आणि सायकल रॅली अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमास शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमास माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर , प्र.उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह माहिती व जनसंपर्क विभाग, क्रीडा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. सकाळी 6.30 वा. ठाण्यातील सायकल महापौर चिराग शहा यांच्यामार्फत ठाणे महापालिका भवन ते राम गणेश गडकरी रंगायतन अशी सायकल रॅली तिरंगा घेवून काढण्यात आली होती. या रॅलीत मोठ्या प्रमाणावर सायकलस्वार सहभागी झाले होते. हातात  तिरंगा घेवून वंदे मातरम् च्या घोषणा देत ही रॅली निघाली.
यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाणी व नृत्य सादर केले. यावेळी मीनताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेच्या लिनता मुणगेकर, संगीता धुरी, शीतल जाधव, कांचन नाईक, अश्विनी गवस आदींनी देशभक्तीपर समूहगान सादर केले. तर राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या सिदधी मालीवाल, साहिल देसाई यांनी देशभक्तीपर गीते, तर शाळा क्र. 29 च्या विद्यार्थीनी मोहिनी जयस्वाल, मीना चौधरी, आचल प्रजापती, पौर्णिमा अंभोरे, आशा राठोड जिद्द शाळेचे कर्मचारी सपना वेलींगकर, डॉ. भाग्यश्री तांबे, डॉ. संगीता बोरसे यांनी यांनी तेरी मिटी मे मिल जावा या गाण्यावर नृत्य सादर केले. तर शाळा क्र. 18 व शाळा क्र. 42 च्या विद्यार्थ्यांनी देखील नृत्य सादर केले. यावेळी सर्वांना तिरंगा ध्वजाच्या सन्मानाची शपथ घेतली.

Post a Comment