महाराष्ट्र कारागृह विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना मा.राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवेबाबतचे पदक घोषित.

 



महाराष्ट्र कारागृह विभागातील खालील नमुद अधिकारी/ कर्मचारी यांना स्वातंत्र्यदिन दिनांक 15 ऑगस्ट 2025 च्या औचित्यावर मा.राष्ट्रपतींकडून गुणवत्तापूर्ण सेवेकरीता पदक जाहीर करण्यात आले असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले आहे.

मा.राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवेबाबतचे पदक

1. श्रीमती राणी राजाराम भोसले, अधीक्षक, ठाणे मध्यवर्ती कारागृह.

2. श्री राजाराम रावसाहेब भोसले, अतिरिक्त अधीक्षक, ठाणे मध्यवर्ती कारागृह.

3. श्री गजानन काशिनाथ सरोदे, उपअधीक्षक, मुंबई मध्यवर्ती कारागृह.

4. श्री संजय गंगाराम शिवगण, सुभेदार, मुंबई मध्यवर्ती कारागृह

5. श्री सुधाकर ओंकार चव्हाण, हवालदार, मुंबई मध्यवर्ती कारागृह.

6. श्री राजेश मधुकर सावंत, हवालदार, भायखळा जिल्हा कारागृह

7. श्री संजय सदाशिव जाधव, हवालदार, भायखळा जिल्हा कारागृह

8. श्रीमती विद्या भरत ढेंबरे, कारागृह शिपाई, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह.

उक्त नमूद केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सेवा कालावधीत शासकीय कर्तव्याप्रती दाखविलेली सचोटी व निष्‍ठेचा एक प्रकारे सन्मान झाला आहे. ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मा.राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवापदक घोषित झाले आहे त्यांचे कारागृह विभागाचे वतीने मा. श्री.सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य व मा. श्री.योगेश देसाई, विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य यांनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत