जिल्हा परिषद ठाणे येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
(जिल्हा परिषद, ठाणे) - भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद, ठाणे येथे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत व राज्यगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत 'हर घर तिरंगा' अभियान जिल्ह्यात उत्साहात साजरे करण्यात आले. या निमित्ताने जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांनी तिरंगा प्रतिज्ञा, तंबाकू मुक्त शपत, अवयव दान शपत घेतली.
या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. वल्लभ जोशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र.) अविनाश फडतरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, कार्यकारी अभियंता बांधकाम पद्माकर लहाने, जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रकाश सासे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) देविदास महाजन, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, कृषी विकास अधिकारी एम.एम. बाचोटिकर, कार्यकारी अभियंता सर्व शिक्षा अभियान युवराज कदम यांसह इतर सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment