नारायण पवार यांच्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा
ठाणे : भाजपाचे महापालिकेतील माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने दोन दिवस विविध सामाजिक उपक्रम उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांचा वाढदिवस दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. त्यानुसार १ ऑगस्ट रोजी सकाळी रायगड गल्लीत मोफत कायरोप्रॅक्टिक उपचार शिबीर आयोजित करण्यात आले होते त्यात डॉ. रवींद्र शिंदे यांच्याकडून पाठदुखी, मानदुखी, गुडघेदुखी, स्पॉंटेलायसिस यावर मार्गदर्शन करण्यात आले.तर एका दिव्यांग तरुणीला व्हीलचेअरही देण्यात आली.तसेच रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले होते यावेळी स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले यावेळी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला सुरक्षा कवच म्हणून हेल्मेट देण्यात आले.
तर ३१ जुलै रोजी रायगड गल्लीत सकाळी भव्य मोफत आरोग्य शिबिर भरविले आहे. त्यात डॉ. जे. के. शर्मा यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची तपासणी करण्यात आली. तर प्लॅटिनम हॉस्पिटलच्या वतीने याच ठिकाणी मोफत ह्रदय तपासणी, तर स्वराशी नेत्रालयाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी करण्यात आली . तर शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या रुग्णांवर माफक दरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.तसेच सायंकाळी सिद्धेश्वर तलाव,पाचपाखाडी,चंदनवाडी,टेकडी बंगला,आनंद सावली,गणेशवाडी,नुरीबाबा दर्गा आदी भागातील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना २० हजार वह्यांचे वाटप करण्यात आले. सिद्धेश्वर तलाव येथील स्नो व्हाईट अपार्टमेंटमधील कार्यालयात सकाळी नवीन शिधापत्रिका व दुरुस्ती शिबीर संपन्न झाले. प्रभागातील १२ गोविंदा पथकांना सुरक्षितता कीटचे वाटप करण्यात आले.अशा प्रकारे विविध सामाजिक उपक्रमात राबवून नारायण पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
----------------------------------------------------------------------
Post a Comment